मध्यरात्री 'फटाका सायलेन्सर' वाजवत दहशत माजवणाऱ्या हुल्लडबाजांना काळेपडळ पोलिसांचा मोठा दणका: १३ जण निष्पन्न, ११ बुलेटसह गॅरेज चालकांवरही गुन्हे दाखल!

 


पुणे (काळेपडळ):
पुणे शहरातील उपनगरांमध्ये मध्यरात्रीच्या वेळी दुचाकींचे सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत नागरिक व रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी अत्यंत कठोर आणि धडक कारवाई केली आहे. दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी रात्री २३:०० वाजेपासून ते दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ०५:०० वाजेच्या सुमारास काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडनगर चौक, न्याती चौक, रहेजा विस्टा चौक, उंड्री आणि महंमदवाडी या परिसरात रस्त्यांवर तरुण मुलांनी बुलेट तसेच अन्य साध्या मोटारसायकलच्या सायलेन्सरमधून मोठमोठ्याने फटाक्यांसारखे आवाज काढत धोकादायक रीतीने गाड्या चालवून धुमाकूळ घातला होता.

या प्रकाराचे रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. मध्यरात्रीच्या वेळी अचानक होणाऱ्या या कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः आजारी व्यक्ती, वृद्ध आणि लहान मुले दचकून जागी होत होती. यामुळे नागरिक भयभीत झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याबाबत नागरिकांनी काळेपडळ पोलीस ठाण्याकडे दूरध्वनीवरून तक्रारी दाखल केल्या होत्या.
 
पोलिसांचे विशेष पथक अन् तांत्रिक तपास
नागरिकांच्या तक्रारींची अत्यंत गंभीर दखल घेत काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वतीने तात्काळ विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार राजस शेख, पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांचा समावेश होता. या पथकाने घटनास्थळा परिसरातील तांत्रिक पुरावे गोळा केले, तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फटाका बुलेट सायलेन्सरचा आवाज काढून दहशत निर्माण करणाऱ्या तब्बल ११ बुलेट दुचाकीस्वारांचा व त्यांच्यासोबत असलेल्या इसमांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले.
 
तब्बल १३ जणांवर गुन्हे दाखल, ११ दुचाकी जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या एकूण ११ दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या वाहनांमध्ये बुलेट क्र. MH 49 S 8356, एक विना नंबरप्लेट बुलेट, MH 12 RC 3677, MH 14 FN 0639, MH 12 LF 0407, बर्गमन क्र. MH 12 YG 0417, बुलेट क्र. MH 12 MJ 1821, MH 12 JX 2227, MH 12 GP 3450, MH 12 JB 5476 आणि MH 12 KZ 7082 या वाहनांचा समावेश आहे.

या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, २९२ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १८२(अ), १९४(एफ), १९८, १७७, क्रिमिनल लॉ दुरुस्ती कायदा कलम ७ आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम कलम १२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या/आरोपी निष्पन्न झालेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत: 

१) सुमीत वसंत सगट (वय २० वर्षे, रा. इंदिरा नगर, महंमदवाडी, पुणे)
२) शिवम दीपक जाधव (वय २१ वर्षे, रा. इंदिरा नगर, महंमदवाडी, पुणे)
३) आर्यन जगन्नाथ गायकवाड (वय १९ वर्षे, रा. इंद्रायणी नगर, महंमदवाडी, पुणे)
४) सार्थक प्रदिप अल्हाट (वय १८ वर्षे, रा. कृष्णा नगर, महंमदवाडी, पुणे)
५) राज उर्फ यश सागर रणदिवे (वय १९ वर्षे, रा. कृष्णा नगर, महंमदवाडी, पुणे)
६) तुषार नितीन गायकवाड (वय २१ वर्षे, रा. कृष्णा नगर, महंमदवाडी, पुणे)
७) धीरज लक्ष्मण गेंजगे (वय २३ वर्षे, रा. कृष्णा नगर, महंमदवाडी, पुणे)
८) प्रेम सिद्धार्थ गायकवाड (वय १८ वर्षे, रा. गोपाळपट्टी, मांजरी, पुणे)
९) दयानंद रामचंद्र सुतार (वय ५० वर्षे, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे)
१०) वरद सनी तोडकर (वय १८ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे)
११) दिनेश रितेश लांबोटे (वय १९ वर्षे, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, महंमदवाडी, पुणे)
१२) राजेंद्र सतीश वाघमोडे (वय १८ वर्षे, रा. सुलाई कॉम्प्लेक्स मागे, महंमदवाडी, पुणे)
१३) रवी किसन लोखंडे (वय २० वर्षे, रा. शेल पंपामागे, महंमदवाडी, पुणे)
 
अवैध सायलेन्सर बसवणाऱ्या ३ गॅरेज मालकांवरही थेट कारवाई
केवळ दुचाकीस्वारांवरच कारवाई करून न थांबता, पोलिसांनी या वाहनांना बेकायदेशीरपणे मॉडिफाय करून फटाका सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेज मालकांचाही शोध घेतला आणि त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उचलला.
यामध्ये यूसूफ फारुख शेख (वय २४ वर्षे, रा. गल्ली नं ४, गुलामअली नगर, सय्यदनगर, हडपसर), निखील फुलाजी सरडे (वय २६ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर) आणि रोहन बबलू महापुरे (वय २४ वर्षे, रा. पोस्टमन कॉलनी, महंमदवाडी) या तिन्ही गॅरेज चालकांनी बेकायदेशीररीत्या मॉडीफाईड सायलेन्सर बसवून दिल्याप्रकरणी त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या वाहनांचे हे कर्णकर्कश सायलेन्सर पोलिसांकडून काढून नष्ट करण्यात आले आहेत.
 
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम
काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे फटाका सायलेन्सर वाजवून दहशत पसरवणाऱ्या इतरही दुचाकीस्वारांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. सदरची उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-६, पुणे शहर) जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ  निरीक्षक गिरीषा निंबाळकर आणि निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर यांच्या सूचनेनुसार पार पडली.

या धडक कारवाईच्या पथकात सहाय्यक निरीक्षक विलास सुतार, सपोफौ/राजस शेख, अंमलदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, शाहिद शेख, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर आणि लक्ष्मण काळे यांनी सहभाग नोंदवला.


  • Labels: Pune Crime News, Kalepadal Police Station, Bullet Silencer Action, Modifed Silencer Seized, Pune Police News, Traffic Violations Pune

  • Search Description: Kalepadal Police Station in Pune seized 11 Bullet motorcycles and registered cases against 13 youths and 3 garage owners for creating terror with loud silencer sound in Undri and Mohammadwadi areas.

Hash Tags

#PunePolice #KalepadalPolice #ActionOnRiders #BulletSilencer #PuneNews #TrafficPolice #CrimeBranchPune #CrimeNewsPune

मध्यरात्री 'फटाका सायलेन्सर' वाजवत दहशत माजवणाऱ्या हुल्लडबाजांना काळेपडळ पोलिसांचा मोठा दणका: १३ जण निष्पन्न, ११ बुलेटसह गॅरेज चालकांवरही गुन्हे दाखल! मध्यरात्री 'फटाका सायलेन्सर' वाजवत दहशत माजवणाऱ्या हुल्लडबाजांना काळेपडळ पोलिसांचा मोठा दणका: १३ जण निष्पन्न, ११ बुलेटसह गॅरेज चालकांवरही गुन्हे दाखल! Reviewed by ANN news network on ८/०३/२०२६ ०६:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".