मुंबई: माझगावच्या 'मोरया' गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीत अंडी फेकून शांतता भंग करणाऱ्या आरोपीला भायखळा पोलिसांनी ३६ तासांच्या आत अटक केली आहे.
दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी रामभाऊ भोगले मार्गावरून जात असलेल्या माझगावच्या मोरया मिरवणुकीत अज्ञात व्यक्तीने वरून अंडी फेकल्याची घटना घडली होती. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊन तणाव निर्माण झाला होता. भायखळा पोलिसांनी बीएनएस कलम २९९ व १९६ अन्वये गुन्हा नोंदवून ५ पथके तयार केली.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी दानिश शेर खान (वय २२) याला अटक केली. दानिश ऑनलाइन अंडी घरपोच देण्याचे काम करतो. घटनेच्या दिवशी इमारतीत अंडी पोहोचवताना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास झाल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत व पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
Labels: Byculla Police, Mazgaon Morya, Mumbai News, Crime Arrest, Online Delivery Boy
Search Description: Byculla Police arrested 22-year-old Danish Sher Khan within 36 hours for throwing eggs at Mazgaoncha Morya Ganpati procession.
Hashtags: #BycullaPolice #MumbaiNews #GaneshUtsav #CrimeUpdate #LawAndOrder
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा