मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

२९ वर्षांपासून फरार असलेल्या सराईत 'पापलेट' ला सोलापूरमधून अटक


मुंबई: भांडुप पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने विशेष कामगिरी करत खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील २९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सोलापूरच्या करमाळा येथून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रवींद्र उर्फ पापलेट एकनाथ विचारे (वय ६१, रा. नागठाणे, जि. सातारा) असे आहे. आरोपीविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात १९८९ ते १९९१ दरम्यान कलम ३०२ (खून), कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि कलम ३९७ (दरोडा) अन्वये तीन गंभीर गुन्हे दाखल होते. मुंबई सत्र न्यायालयाने त्याला फरार घोषित करून स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

आरोपी १९९७ पासून नाव व पत्ता बदलून राहत असल्याने त्याची माहिती मिळत नव्हती. तो करमाळा येथे राहत असल्याची गुप्त माहिती मिळताच, सहायक पोलीस निरीक्षक दळवी व पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे 'आशुतोष लॉज'मधून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षीेरसागर यांच्या देखरेखीखाली पार पडली.

  • Labels: Bhandup Police, Fugitive Arrested, Crime News Mumbai, Murder Suspect, Solapur Arrest

  • Search Description: Bhandup Police arrested Ravindra alias Paplet Vichare, a fugitive wanted in murder and dacoity cases for 29 years, from Solapur.

  • Hashtags: #BhandupPolice #ColdCase #FugitiveArrested #MumbaiCrime #LawEnforcement


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा