पिंपरी-चिंचवड महापालिका कचरा प्रकल्प दुर्घटना: ९ जणांच्या मृत्यूला पालिका प्रशासन जबाबदार : सुषमा अंधारे

 


पिंपरी, १२ जुलै २०२६: मोशी कचरा डेपो आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नुकत्याच झालेल्या भीषण दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेना(उबाठा) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पिंपरी चिंचवड शहराला भेट देऊन मोशी दुर्घटनेतील जखमींची रुणालयात जाऊन विचारपूस केली. आणि मृतांच्या नातेवाईंकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या दुर्घटनेला महापालिका आयुक्त, पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी आणि ऎन्टनी लारा कंपनी जबाबदार असल्याचे सांगत. जरूरतर आपला पक्ष या मुद्द्यावर न्यायालय, विधीमंडळ सभागृह आणि रस्त्यावर उतरून ही लढाई लढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला दिला. यावेळी  पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनीही पालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

घटनेचे गांभीर्य आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा

मोशी डंपिंग ग्राऊंड परिसरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची इमारत ८ जुलै रोजी  कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ४ व्यक्तींवर साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि रुग्णालय संचालक डॉक्टर कांबळे यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

यावेळी बोलताना अंधारे म्हणाल्या, या प्रकरणात

  • अनाधिकृत बांधकाम: ज्या इमारतीचा परवाना केवळ तळमजल्यासाठी होता, तिथे वरचे दोन मजले कोणत्याही परवानगीशिवाय बांधण्यात आले होते. या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता, असे निष्पन्न होत आहे.

  • प्रशासनाची भूमिका: पालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांनी या गंभीर घटनेवर कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. माहिती देण्याऐवजी अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

  • कंपनीची साठगाठ: अँटोनी लारा रिव्नेबल कंपनीवर गंभीर आरोप करत, या कंपनीकडून कोणत्या प्रकारचे उप-उत्पादने (By-products) तयार केले जात होते, याची माहिती प्रशासनाने गुलदस्त्यात ठेवली आहे.

पर्यावरण दिन आणि दुर्घटनेचा संबंध

५ जून, पर्यावरण दिनाच्या दिवशीच या प्रकल्पाची चिमणी कोसळली होती. त्यानंतरही त्या परिसरात खदानीचे काम सुरू असून तिथे ब्लास्टिंग केले जात होते. या ब्लास्टिंगच्या धक्क्यामुळे कचऱ्याचा १८०-१८५ फूट उंचीचा डोंगर तडा जाऊन कोसळला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात साठलेल्या मिथेन वायूच्या गळतीमुळेही धोका निर्माण झाला होता, मात्र याकडे प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांनी दुर्लक्ष केले.

प्रशासनावर कारवाईची मागणी

अंधारे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद अद्याप झालेली नाही. मृतांच्या नातेवाईकांना ५ ते १० लाखांची मदत देऊन प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करू नये. या नऊ बळींना जबाबदार असणाऱ्या पालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

येत्या दोन दिवसांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार असून, गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा अंधारे यांनी दिला आहे.


Labels: Pimpri Chinchwad News, Moshi Garbage Depot, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Industrial Accident, Shivsena UBT, Administrative Negligence 

Search Description: Shivsena UBT party demands suspension of Pimpri Chinchwad Municipal Commissioner and project officer Sanjay Kulkarni following the tragic death of 9 people at the Moshi garbage plant. 

Hashtags: #PimpriChinchwadNews #MoshiGarbagePlant #AdministrativeNegligence #ShivsenaUBT #PimpriNews #JusticeForVictims 



पिंपरी-चिंचवड महापालिका कचरा प्रकल्प दुर्घटना: ९ जणांच्या मृत्यूला पालिका प्रशासन जबाबदार : सुषमा अंधारे पिंपरी-चिंचवड महापालिका कचरा प्रकल्प दुर्घटना: ९ जणांच्या मृत्यूला पालिका प्रशासन जबाबदार  : सुषमा अंधारे Reviewed by ANN news network on ७/१२/२०२६ ०८:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".