सोशल मीडियावरील मित्रानेच रोख रकमेसह दागिन्यांवर मारला होता हात; कोंढवा पोलीस पोहोचले गुजराथ राज्यात; आरोपीला घेतले ताब्यात

 


पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात सोशल मीडियावरील मैत्रीचा गैरफायदा घेऊन एका महिलेच्या घरातील १४ लाख ६३ हजार ४९६ रुपयांचा ऐवज चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुजरात राज्यातील वडोदरा येथून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. २५ जून २०२६ रोजी घडलेल्या या गुन्ह्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. फिर्यादी महिला कोंढवा खुर्द येथील त्यांच्या घरी असताना, सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेला मित्र यश हा त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आला होता. दरम्यान, फिर्यादी महिला त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मावशीच्या घरी जेवणाचा डबा देण्यासाठी काही वेळेसाठी गेल्या असता, संधी साधत मित्र यश याने बेडरुममधील कपाटात ठेवलेली २४ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १४ लाख ६३ हजार ४९६ रुपयांचा ऐवज लांबवून तिथून पळ काढला होता. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार केशव हिरवे यांनी प्रकरणाचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. तांत्रिक तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपी हा गुजरात राज्यातील वडोदरा येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, दाखल गुन्ह्यातील आरोपी यश (पूर्ण नाव व पत्ता सुरुवातीला माहीत नसलेला) याचा शोध घेण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्याच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल रासगे आणि केशव हिरवे यांचे पथक गुजरातला रवाना झाले. गुजरात राज्यातील गोरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेतला असता, आरोपी सुभानपुरा येथील आयपीसीएल रोड, वडोदरा येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अत्यंत गोपनीय व शिताफीने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याचे नाव व पत्ता विचारला असता, त्याने आपले नाव यश कैलास भुलचंदानी (वय २४ वर्षे, रा. गाव मोहाडी, तहसील बीजापुर, जिला म्हैसाणा, राज्य गुजरात) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १४ लाख ३९ हजार ४९६ रुपयांचा ऐवज यशस्वीरीत्या हस्तगत केला आहे.

सदरची ही धडक कारवाई पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त, वानवडी विभाग रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस, निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले यांच्या सूचनांनुसार कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे  उपनिरीक्षक रविंद्र गावडे, अंमलदार अमोल हिरवे, रविंद्र चिप्पा, विशाल मेमाणे, राहुल शितोळे, केशव हिरवे, राहुल रासगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित सुर्यवंशी, संतोष बनसुडे, रियाज पटेल, राहुल शेलार, रशिद शेख, सुरज शुक्ला, शाहिद रजपुत आणि ओंकार शेटे यांच्या पथकाने पार पाडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.


  • Labels: Pune Police, Kondhwa Police Station, Crime News Pune, Housebreaking Arrest, Gujarat Operation, Cyber Friendship Crime

  • Search Description: Pune Kondhwa police arrested a accused from Vadodara, Gujarat, for stealing cash and gold worth over 14 lakhs after befriending a woman on social media.

  • Hashtags: #PunePolice #KondhwaPolice #CrimeNews #MaharashtraPolice #Vadodara #PoliceAction #BreakingNews

सोशल मीडियावरील मित्रानेच रोख रकमेसह दागिन्यांवर मारला होता हात; कोंढवा पोलीस पोहोचले गुजराथ राज्यात; आरोपीला घेतले ताब्यात सोशल मीडियावरील मित्रानेच रोख रकमेसह दागिन्यांवर मारला होता हात; कोंढवा पोलीस पोहोचले गुजराथ राज्यात; आरोपीला घेतले ताब्यात Reviewed by ANN news network on ७/२४/२०२६ ०३:३३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".