कासारवाडी रेल्वे फाटक बंद करू नका! खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी



पिंपरी:
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील कासारवाडी येथील रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक-६१ कायमस्वरूपी बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या हालचालींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कासारवाडी गाव रेल्वे मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभागले गेले असून, हे रेल्वे फाटक दोन्ही भागांना जोडणारा एकमेव व अत्यंत महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. हे फाटक बंद झाल्यास दररोज हजारो नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच आपत्कालीन सेवांना मोठा वळसा घालावा लागणार आहे. त्यामुळे जनहिताचा आणि जनभावनांचा विचार करून रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक-६१ बंद करण्याचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा आणि ते पूर्ववत सुरू ठेवावे, अशी ठाम मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रेल्वे प्रशासनाने कासारवाडी येथील फाटक क्रमांक-६१ कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सूचना जारी केली असून, स्थानिक पातळीवर त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळे कासारवाडीतील सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जनजीवनावर गंभीर परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी मध्य रेल्वे महाप्रबंधकांचे लक्ष वेधले असून, स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या तीव्र भावना प्रशासनासमोर मांडल्या आहेत.

शाळकरी विद्यार्थी आणि आपत्कालीन सेवांवर प्रतिकूल परिणाम

कासारवाडी पश्चिम भागातील शेकडो विद्यार्थी पूर्व भागातील श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. हे रेल्वे फाटक बंद झाल्यास विद्यार्थ्यांना लांबचा आणि धोकादायक मार्ग स्वीकारावा लागेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय तर होईलच, शिवाय त्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

त्याचप्रमाणे, परिसरातील अंत्ययात्रा, अंत्यसंस्कार आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनांसाठी हाच मार्ग मध्यवर्ती ठरतो. पर्यायी मार्गामुळे आपत्कालीन सेवांना पोहोचण्यासाठी विलंब झाल्यास नागरिकांच्या जीवित व वित्तास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

पारंपरिक सण व सांस्कृतिक उत्सवांचा एकमेव मार्ग

कासारवाडीमध्ये दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक, एक गाव-एक शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हिंदू नववर्ष (गुढीपाडवा), बसवराज महाराज मिरवणूक, ईद-ए-मिलाद तसेच श्री भैरवनाथ यात्रा व पालखी सोहळा असे विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम एकत्र येऊन साजरे केले जातात. या सर्व पारंपरिक मिरवणुका आणि कार्यक्रमांच्या आयोजनासाठी रेल्वे फाटक क्रमांक-६१ अत्यंत महत्त्वाचे आहे. हे फाटक बंद झाल्यास या ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात मोठे अडथळे निर्माण होतील.

प्रशासकीय एनओसीवर प्रश्नचिन्ह आणि पर्यायी मार्गाची अयोध्येता

रेल्वे विभागाने या फाटकाची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवल्याचे समोर आले आहे. मात्र, हे प्रमाणपत्र मिळवताना स्थानिक नागरिकांची संमती, त्यांची दैनंदिन गरज आणि सामाजिक परिस्थितीचा कोणताही अभ्यास करण्यात आलेला नाही, असा थेट आरोप खासदार बारणे यांनी केला आहे.

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेला नाशिक फाटा जे.आर.डी. टाटा पूल ते शंकर मठ हा पर्यायी मार्ग अत्यंत लांबचा आणि वाहतूक कोंडीने ग्रस्त आहे. दैनंदिन प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा मार्ग पूर्णपणे अंव्यवहार्य असून, यामुळे नाशिक फाटा चौकातील वाहतूक कोंडी अधिक तीव्र होईल, असेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

पर्यायी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची चाचपणी करण्याची मागणी

जर तांत्रिक, प्रशासकीय अथवा सुरक्षिततेच्या कारणास्तव रेल्वे फाटक क्रमांक-६१ बंद करणे अत्यंत अपरिहार्य असेल, तर आधी त्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल (ROB) किंवा भुयारी मार्ग (RUB) उभारण्यात यावा. या पर्यायी पुलाचे किंवा भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन ते नागरिकांच्या वापरासाठी खुले झाल्यानंतरच जुने फाटक बंद करण्यात यावे, असा पर्याय खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रशासनापुढे ठेवला आहे. रेल्वे विभागाने तातडीने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक पातळीवर दिला जात आहे.


  • Labels: Kasarwadi Railway Crossing, Shirang Barne, Central Railway, Pimpri Chinchwad News, Mawal Lok Sabha, Railway Level Crossing 61

  • Search Description: MP Srirang Barne demands Central Railway not to permanently close Kasarwadi railway crossing gate 61 in Pimpri, citing public inconvenience and traffic issues.

  • Hashtags: #Kasarwadi #PimpriChinchwad #SrirangBarne #CentralRailway #IndianRailways #PimpriNews #PublicIssue

कासारवाडी रेल्वे फाटक बंद करू नका! खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी कासारवाडी रेल्वे फाटक बंद करू नका! खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी Reviewed by ANN news network on ७/३१/२०२६ ०७:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".