पुणे: पावसाळ्याच्या दिवसांत मुसळधार पाऊस, रस्ते व परिसरात पाणी साचणे, वादळी वारे सुटणे आणि झाडांच्या फांद्या तुटून पडणे अशा नैसर्गिक कारणांमुळे रस्त्यावरील विद्युत यंत्रणेत बिघाड होण्याची दाट शक्यता असते
पुणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी खालील अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत:
स्पर्श करणे टाळा: पावसाळ्यात रस्त्यावरील पथदिव्यांचे खांब, फिडर पिलर, जंक्शन बॉक्स अथवा उघड्यावर आलेल्या, तुटलेल्या भूमिगत विद्युत केबल्स व तारांना विनाकारण स्पर्श करू नये आणि त्यापासून सुरक्षित अंतर राखावे
. पाणी साचलेल्या ठिकाणी जाऊ नका: विद्युत खांब किंवा फिडर पिलर परिसरात पाणी साचले असल्यास नागरिकांनी त्या ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे
. खांबांचा गैरवापर थांबवा: कोणत्याही पथदिव्याच्या खांबावर जाहिरातींचे बॅनर, फ्लेक्स, दोऱ्या किंवा तारा बांधू नयेत
. तसेच कपडे वाळत घालण्यासाठी किंवा जनावरे बांधण्यासाठी महापालिकेच्या खांबांचा वापर करू नये . अनधिकृत वीजजोडणीवर बंदी: विद्युत खांबांमधून किंवा फिडर पिलरमधून कोणत्याही प्रकारे अनधिकृत वीजजोडणी (आकडा टाकणे) घेऊ नये, तसेच विद्युत यंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये
. रस्ते खोदाई किंवा बांधकाम करताना भूमिगत केबल्सचे नुकसान होणार नाही, याची विकासकांनी दक्षता घ्यावी .
शहरात कुठेही पावसामुळे तुटलेली वीजवाहक तार, वाकलेला अथवा गंजलेला खांब, उघडा जंक्शन बॉक्स किंवा विद्युत सुरक्षेला बाधा आणणारी कोणतीही बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित क्षेत्रीय कार्यालयास किंवा पुणे मनपाच्या विद्युत विभागास कळवावे, अशी माहिती देण्यात आली आहे
Labels: Pune Traffic Updates, PCMC Palkhi Sohala 2026, Ashadhi Ekadashi, Traffic Diversions Pune, PMC Electrical Safety, Sayyadanagar One Way
Search Description: Pimpri-Chinchwad and Pune traffic police issued route diversions for Sant Tukaram and Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026. PMC issues rain safety guidelines for electrical pillars.
Hashtags: #PalkhiSohala2026 #PuneTraffic #PCMCTraffic #Alandi #Dehu #TrafficAlert #PMCSafety #Monsoon2026 #PunePolice
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: