मुंबई: रामरक्षा आंदोलनाचे निमंत्रण देण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्वतःच्या हिंदुत्वावर आत्मपरीक्षण करावे, अशी आक्रमक भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मांडली आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांना निमंत्रण देण्याआधी राऊत यांनी हिंदुत्व का सोडले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान बन यांनी दिले.
संघ स्थानावर माफी मागावी
संजय राऊत सध्या नागपूरमध्ये दौरयावर आहेत. मात्र, ते संघ स्थानावर जात नाहीत, अशी टीका करत बन म्हणाले की, हिंदुत्ववादाशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केल्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी संघ स्थानावर जाऊन नाक घासून माफी मागितली पाहिजे. तरच महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनता त्यांना माफ करेल आणि भाजप रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याबाबत विचार करेल.
मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपची स्पष्टोक्ती
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे, अशी ठाकरे गटाची इच्छा असली तरी तसे होणार नाही, असे स्पष्ट करत बन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याचे नुकसान झाले आहे. आता महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम सुरू आहे. जनतेने फडणवीस यांना पाच वर्षांसाठी निवडले असून, २०२९ ची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढली जाईल.
आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर टीका
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत, तो केवळ भाजप आणि महायुतीच्या भीतीमुळे आहे, असा दावा बन यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी असल्यास आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन दहा दिवस कडक उपोषण करावे, असा टोला त्यांनी लगावला. राऊत यांनी पत्रकार परिषदा घेण्याऐवजी उपोषण केल्यास महाराष्ट्राला शांतता मिळेल, असेही ते म्हणाले.
राजकीय भूकंपाच्या चर्चा फेटाळल्या
केंद्रात आणि राज्यात लवकरच सत्तांतर होईल, अशा चर्चांना पूर्णविराम देताना बन यांनी सांगितले की, केंद्रात स्थिर सरकार असून स्पष्ट बहुमत आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याबाबत सुप्रिया सुळे यांनीही सकारात्मक संकेत दिले आहेत. राज्यातही दोन तृतीयांश बहुमत असल्याने कसल्याही प्रकारच्या राजकीय भूकंपाची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Labels: BJP, Sanjay Raut, Navnath Ban, Uddhav Thackeray, Maharashtra Politics, Ramraksha Andolan
Search Description: BJP spokesperson Navnath Ban slams Sanjay Raut, demanding an apology at the Sangh Sthan before inviting BJP leaders to the Ramraksha Andolan, while affirming support for Devendra Fadnavis.
Hashtags: #BJP #SanjayRaut #MaharashtraPolitics #NavnathBan #RamrakshaAndolan #DevendraFadnavis
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: