'अजित पर्व' पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रकाशन; अजित पवार यांच्या जीवनकार्याचा वेध

 


पिंपरी (पुणे): हार्ट प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या 'अजित पर्व' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. लोकनेते स्व. अजित पवार यांच्या दैदीप्यमान जीवनकार्याचा, कार्यसंस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदानाचा वेध घेणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या भव्य सोहळ्यास राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. स्व. अजित पवार यांच्या शिस्तप्रिय कार्यक्षम नेतृत्वाचा, निर्णयक्षम विकासदृष्टीचा आणि लोककल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा वस्तुनिष्ठ व अचूक वेध या पुस्तकात घेण्यात आला असून, हे पुस्तक प्रत्येक वाचकासाठी आणि कार्यकर्त्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

पुस्तकाचे लेखक प्रकाश जाधव यांनी सखोल संशोधन, संदर्भ आणि वास्तववादी मांडणीच्या द्वारे अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू अतिशय प्रभावीपणे उलगडले आहेत.

या प्रकाशन सोहळ्याला पुस्तकाचे लेखक प्रकाश जाधव, प्रकाशक विनोद शिंदे (हार्ट प्रकाशन, पुणे), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, ॲड. लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील, संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे, किरण खोत यांच्यासह अनेक मान्यवर, साहित्यप्रेमी आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा केवळ एका पुस्तकाचे प्रकाशन न ठरता, महाराष्ट्राच्या एका कार्यक्षम, दूरदृष्टीच्या आणि लोकाभिमुख नेतृत्वाला पुस्तक रुपाने वाहिलेली भावपूर्ण आदरांजली ठरला.

Labels: Ajit Pawar, Sunetra Pawar, Ajit Parva Book, Pimpri Chinchwad News, Maharashtra Politics, Book Launch 

| Search Description: Deputy CM Sunetra Pawar unveils the book 'Ajit Parva' authored by Prakash Jadhav, showcasing the life and political legacy of Ajit Pawar in Pimpri. 

| Hash Tags: #AjitPawar #SunetraPawar #AjitParva #PimpriNews #MaharashtraNews #BookRelease #NCP 


'अजित पर्व' पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रकाशन; अजित पवार यांच्या जीवनकार्याचा वेध 'अजित पर्व' पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रकाशन;  अजित पवार यांच्या जीवनकार्याचा वेध Reviewed by ANN news network on ७/२५/२०२६ ०९:३०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".