शिक्षकांचा अनोखा सन्मान आणि 'घबाड कुंड' चित्रपटाचे प्रमोशन
भोसरी (पिंपरी-चिंचवड)): शालेय जीवनातील सोनेरी दिवसांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि आपल्या लाडक्या गुरुवर्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भोसरी येथील श्रीराम विद्या मंदिर सण २००७-०८ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा आणि तत्कालीन शिक्षकांचा एक अभूतपूर्व व भावनिक स्नेहमेळावा नुकताच विद्यालयाच्या आवारात अत्यंत उत्साहात झाला. तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा तोच दहावीचा वर्ग आणि तीच मित्रमंडळी एकत्र आल्याने सर्वच माजी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि डोळ्यांत सुखद अश्रू तरळत होते. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयाला मौल्यवान पुस्तके भेट दिली असून, विद्यालयाच्या भावी विकासासाठी भरीव आर्थिक निधी देखील सुपूर्द केला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय शिस्तबद्ध आणि आठवणींच्या प्रवासाने झाली. सकाळी ठीक ११ वाजता शाळेची पारंपरिक घंटा वाजली आणि अठरा वर्षांपूर्वीप्रमाणेच सर्व विद्यार्थी आपापल्या बाकांवर येऊन बसले. शिक्षकांनी वर्गात प्रवेश करताच सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि अत्यंत भावपूर्ण वातावरणात 'स्वर्गात आकाशगंगा' या गीताच्या सुरावटीत शिक्षकांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. या भावूक स्वागताने सर्वच शिक्षकांची मने हेलावून गेली. यानंतर शाळेच्या उभारणीत मोलाचा वाटा असणारे त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. पांडुरंग गुळवे, माजी विद्यार्थी संघाचे प्रेरणास्थान कै. खंडू ढमाले आणि मातृहृदयी कै. उमाताई गुळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देत आपल्या जुन्या आठवणींना वाट मोकळी करून दिली, तसेच सर्व उपस्थित शिक्षकांचा या बॅचच्या वतीने शाल व स्मृतीचिन्ह देऊन उचित सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे यांनी आपल्या मनोगतात शाळेत स्थापन केलेल्या माजी विद्यार्थी संघाचा हेतू स्पष्ट केला. सर्व विद्यार्थ्यांनी या संघात अधिक संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शाळा मोठी करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात विशेष रंगत आली जेव्हा नेहमी आघाडीवर असणाऱ्या शिक्षिका सुनीता भोसले यांनी 'स्वर्गात आकाशगंगा' गीतावर आणि मुख्याध्यापक जगदाळे यांनी "घंटा झाली टण टण" या बालगीतावर मुलांसमवेत प्रत्यक्ष नृत्य सादर केले. शिक्षिका मनीषा गायकवाड यांनी आपल्या वर्गाने याच गीतावर परदेशी पाहुण्यांचे केलेले स्वागत आठवून भावूक उद्गार काढले. यानंतर विद्यार्थ्यांनी काही 'फनी गेम्स' खेळून पुन्हा एकदा बालवयातील निखळ आनंद अनुभवला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आगामी 'घबाड कुंड' या मराठी चित्रपटाचे प्रमोशन या चित्रपटातील बालकलाकारांसह करण्यात आले. भविष्यात शाळेच्या प्रगतीमध्ये आमची बॅच कायम आघाडीवर राहील, असे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पल्लवी काशीद व संध्या बुधर यांनी केले, तर निलेश केदारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या वतीने विक्रम ठाकूर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. शाळेचा माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध केटरर्स सचिन कोळेकर याच्याकडून सर्व पाहुण्यांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, तर सौरभ आगळे व त्याची पत्नी वर्षा आगळे यांनी या संपूर्ण सोहळ्याचे विलोभनीय क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी टॅक्स कन्सल्टंट पल्लवी काशीद, इंजिनीयर संध्या बुधर, प्रियंका भोसले, केतन वाळके, ॲड. प्रवीण गावडे, बिल्डर अमोल पोखरकर आणि बिल्डर प्रताप थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शंकर गुळवे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
Labels
Shriram Vidya Mandir Bhosari, Alumni Meet 2026, Bhosari School News, Batch 2007-08 Reunion, Pimpri Chinchwad Education, Lalasaheb Jagdale Shriram Vidyalaya, Ghabad Kund Movie Promotion
Search Description
The class of 2007-08 of Shriram Vidya Mandir, Bhosari organized a grand alumni reunion after 18 years. Former students felicitated teachers, donated books to the school library, and contributed towards the development fund.
Hashtags
#BhosariSchoolReunion #ShriramVidyaMandir #AlumniMeet2026 #SchoolDays #GuruVandana #PimpriChinchwad #GhabadKund #MarathiNews
Reviewed by ANN news network
on
६/०८/२०२६ ०७:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: