पुणे: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्स बसमधून पुणे शहरात विक्रीसाठी आणलेला २२,९१,५३४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा नऱ्हे पोलिसांनी २३ जून २०२६ रोजी जप्त केला आहे
नऱ्हे पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना, अमंलदार देवा चव्हाण यांना एका ट्रॅव्हल्स बसमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली
पोलिसांनी घटनास्थळावरून माल घेण्यासाठी आलेल्या सोहेल अस्लम मुलाणी (वय २२ वर्षे, रा. ६६७, गंजपेठ, पुणे) याला देखील ताब्यात घेतले
सदर कामगिरी अप्पर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उप-आयुक्त (परिमंडळ ३) सागर कवडे, सहायक आयुक्त (सिंहगडरोड विभाग) विजय कूंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वर्षा देशमुख, निरीक्षक ईश्वर चव्हाण, उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, किरण लिटे, अंमलदार देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, सुमित जगताप, राजु तोरे, नितीन वाघमारे आणि निलेश भोरडे यांच्या पथकाने केली आहे.
Labels: Pune Police, Gutkha Seized Pune, Narhe Police Station, Crime Branch Pune, Gujarat To Pune Smuggling
Search Description: Pune Police seized banned gutkha worth Rs 22.91 lakhs smuggled from Gujarat in a travels bus near Navale Bridge, Narhe.
Hashtags: #PunePolice #GutkhaSeized #NarhePolice #PuneCrime #AntiSmuggling #MaharashtraPolice
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: