पुणे पोलिसांची लातूरमध्ये मोठी कारवाई; खंडणी विरोधी पथकाकडून सराईत हत्यार तस्कर जेरबंद



पुणे: सोशल मीडियावर बेकायदेशीर गावठी पिस्तूलांसह फोटो व रील प्रसारित करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या आणि शस्त्रांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने लातूरमधून पाठलाग करून अटक केली आहे. शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद (वय २० वर्षे, रा. अप्पर इंदिरा नगर, बिबवेवाडी, पुणे) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १,९८,५०० रुपये किमतीची ५ गावठी पिस्तूल आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पर्वती, खडक आणि वाघोली पोलीस ठाण्यांमधील आर्म अ‍ॅक्ट व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये हा आरोपी पोलिसांना पाहिजे होता. तो लातूर येथे लपून बसल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे एक पथक लातूरला रवाना करण्यात आले होते. तपासात निष्पन्न झाले की, आरोपी थेट मध्यप्रदेशातील उमरठी गावातील मुख्य शस्त्र विक्रेत्यांच्या संपर्कात होता आणि पुण्यातील लोकांना तिथे पाठवून मध्यस्थीने पिस्तूल मागवत असे. याप्रकरणी पोलिसांनी वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि येवलेवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त तेजस्वीनी सातपुते, उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, अमलदार सुरेंद्र जगदाळे, कानिफनाथ कारखेले, पवन भोसले, आझाद पाटील, प्रशांत शिंदे, विनोद महाजन, संजय आढारी, अनिल कुसाळकर, प्रदिप परीट, सुजित वाघमारे, गणेश खरात, नितीन मुंढे, चेतन आपटे, किरण पद्याळ, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, साहील शेख, रविंद्र रोकडे, शेखर खराडे, अमोल घावटे आणि अमोल राऊत यांनी बजावली.


  • Labels: Pune Crime Branch, Extortion Cell, Illegal Weapons, Arms Act Case, Pune News

  • Search Description: Pune Police Anti-Extortion Cell arrested a wanted criminal from Latur and seized 5 country-made pistols and 7 live cartridges sourced from MP.

  • Hashtags: #ArmsAct #PuneCrime #WeaponsSeized #CrimeBranch #PunePolice #LaturAction



पुणे पोलिसांची लातूरमध्ये मोठी कारवाई; खंडणी विरोधी पथकाकडून सराईत हत्यार तस्कर जेरबंद पुणे पोलिसांची लातूरमध्ये मोठी कारवाई; खंडणी विरोधी पथकाकडून सराईत हत्यार तस्कर जेरबंद Reviewed by ANN news network on ६/२३/२०२६ ०५:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".