पुणे: रस्त्यावरून गाडी व्यवस्थित चालवण्याबाबत हटकल्याचा राग मनात धरून एका नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोन गुन्हेगारांना चंदननगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केली आहे. ही घटना ९ जून २०२६ रोजी चंदननगर येथील बोराटे वस्ती, वेलकम किराणा स्टोअर्ससमोरील रस्त्यावर घडली होती. पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेला ८ हजार रुपयांचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली काळया रंगाची स्कूटी असा एकूण ३८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी अनिश संदीप सावंत (वय २० वर्षे, रा. वडगावशेरी, पुणे) आणि वेदांत विजय देशमुख (वय २१ वर्षे, रा. वाघोली, पुणे) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी महिला यांचे पती भारत गॅसचा सिलेंडर खरेदी करण्यासाठी गेले असताना, काळया रंगाच्या स्कूटीवरून (एम.एच.१२ एफ.एस.८०९३) आलेल्या आरोपींचा धक्का फिर्यादीच्या पतीला लागला होता. त्यांनी गाडी नीट चालवण्यास सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना गंभीर जखमी करून लुटले होते.
सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, उप आयुक्त (परिमंडळ-७) डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त (खराडी विभाग) नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, तसेच तपास पथकाचे रमेश मेमाणे, अमरसिंग डांगे, विकास कदम, रामदास घावटे, किरण घुटे, ज्ञानोबा लहाणे, चंद्रकांत पाटील आणि सुशिल बेंद्रे यांनी केली.

Labels: Chandannagar Police, Mobile Robbery, Pune Crime, CCTV Investigation, Pune Police
Search Description: Chandannagar Police station arrested two youths for assaulting a citizen and robbing his mobile phone after a road altercation; vehicle recovered.
Hashtags: #PunePolice #RobberyCase #Chandannagar #CrimeUpdate #CCTVInvestigation
बोराटेवस्ती परिसरातील जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघड; दोन आरोपी जेरबंद
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२६ ०५:३६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२६ ०५:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: