पुण्यात चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सीसीटीव्ही आणि रिक्षाच्या नंबरवरून घरफोडीचा छडा, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पुणे, दि. १२ जून २०२६: चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात तपास पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सोलापूर येथून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीचे सोने, चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ३,०१,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रोहित नितीन गायकवाड (वय २८, रा. कृष्णा नगर, महंमदवाडी, पुणे) आणि त्याचा साथीदार मनिष सुजीत नागपुरे (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी चंदननगर परिसरात घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१(१), ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळासह बाजूच्या चौक मधील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी केली. या तपासणीत गुन्ह्याच्या वेळी एका संशयास्पद ऑटो रिक्षाचा (क्रमांक MH-12-NW-8247) वापर झाल्याचे स्पष्ट दिसले.
या रिक्षाच्या मालकाचा शोध घेऊन चौकशी केली असता, त्याने सदर रिक्षा रोहित गायकवाड याला शिफ्टने चालवण्यासाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ गायकवाडच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले, तेव्हा तो सोलापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सोलापूर गाठून त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने साथीदार मनिष नागपुरे याच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली, ज्यावरून त्याला ४ जून २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपींनी चोरलेले १५ ग्रॅम सोने आणि १३०.२७ ग्रॅम चांदीचे दागिने महंमदवाडी व वानवडी येथील सोनारांना विकल्याचे कबूल केले असून, पोलिसांनी सोनारांकडून सर्व दागिने आणि गुन्ह्यातील रिक्षा हस्तगत केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पीआय निलेश बडाख, पीआय अमोल धस, पीएसआय किरण नरवडे आणि तपास पथकातील अंमलदार मेमाणे, डांगे, कदम, घावटे, तसेच वाहतूक शाखेचे एएसआय गणेश येळे व अंमलदार लोकरे यांनी केली आहे.
Labels: Chandan Nagar Police Pune, Pune Housebreaking Arrest, Rohit Gaikwad Burglary, Solapur Police Chase, Pune Crime Branch Seizure
. Search Description: Pune's Chandan Nagar Police cracked a major burglary case using CCTV footage, arresting two suspects and recovering assets worth Rs 3.01 Lakhs
. Hashtags: #PuneCrime #ChandanNagarPolice #BurglaryCracked #CCTVInvestigation #PunePolice #SolapurCatch
पुण्यात चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सीसीटीव्ही आणि रिक्षाच्या नंबरवरून घरफोडीचा छडा, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
Reviewed by ANN news network
on
६/१२/२०२६ १०:१३:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/१२/२०२६ १०:१३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: