'कार्यकर्ते आणि नेते टिकवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम लागते'; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन

 


मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होत असलेल्या घोडेबाजाराच्या आरोपांना भारतीय जनता पार्टीने अत्यंत सडेतोड शब्दांत उत्तर दिले आहे. "माणसे आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी पैशांची नव्हे, तर प्रेमाची आणि जिव्हाळ्याची गरज असते. संजय राऊत आणि त्यांच्या पक्षप्रमुखांकडे माणुसकीच शिल्लक नसल्याने त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकले, ना नेते, ना उमेदवार," असा जोरदार घणाघात भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून फोडाफोडी आणि पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांचा खरपूस समाचार घेताना नवनाथ बन यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, पैशांच्या बळावर काहीही करता येत नाही, परंतु प्रेमाच्या बळावर जगही जिंकता येते. दुसऱ्यांना तुसडेपणाने वागवण्याचे आणि आपले घर बंद ठेवून लोकांना तासन्‌तास दारात उभे करण्याचे उद्योग भाजपा किंवा महायुती करत नाही. आम्ही प्रेमाच्या बळावर माणसे जिंकतो, त्यासाठी आम्हाला पैशांची कोणतीही आवश्यकता भासत नाही. तुम्हा लोकांना प्रेमाची, माणसांची आणि निष्ठेची अजिबात किंमत नाही. कार्यकर्त्यांना न भेटणे आणि आमदारांना दारातूनच परत पाठवणे, यामुळेच उद्धव ठाकरे गटाची आणि पर्यायाने संजय राऊतांची आज ही दयनीय अवस्था झाली आहे.

महायुतीकडे विजयासाठी भक्कम संख्याबळ 

विधान परिषद निवडणुकीच्या गणितावर भाष्य करताना नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची नसून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांच्या मतदानावर अवलंबून असते. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांची आकडेवारी पाहिल्यास, भाजपाकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. तसेच, महायुतीकडे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींचे भक्कम संख्याबळ आहे. या स्पष्ट बहुमतामुळे विधान परिषदेच्या सर्व १७ जागांवर महायुतीचा विजय शंभर टक्के निश्चित आहे. घोडेबाजार करण्याची भाजपाला किंवा महायुतीला अजिबात गरज नाही.

'महाविकास आघाडी'ची आता 'माघार विकास आघाडी' 

पराभवाच्या भीतीपोटीच महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा दावाही नवनाथ बन यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा पॅटर्न हा जनतेचा पॅटर्न आहे. परंतु, प्रत्येक निवडणुकीत ऐन वेळी माघार घेणे, ही महाविकास आघाडीची आता सवयच बनली आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भात गाजावाजा करून अनेक उमेदवार दिले होते, मात्र त्यांना आपले उमेदवार सांभाळता आले नाहीत आणि त्यांच्या उमेदवारांनी माघार घेतली. तीच परिस्थिती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाची झाली आहे. सतत माघार घेणे आणि स्थगिती देणे हाच यांचा मुख्य उद्योग झाल्यामुळे, महाविकास आघाडीचे नाव बदलून आता 'माघार विकास आघाडी' ठेवले पाहिजे, अशी सडकून टीका नवनाथ बन यांनी यावेळी केली.

  • Labels: BJP Maharashtra, Navnath Ban, Sanjay Raut, Legislative Council Election, Maharashtra Politics, Mahayuti vs MVA.

  • Search Description: BJP State Chief Spokesperson Navnath Ban strongly countered Sanjay Raut's allegations of horse-trading in the MLC elections. Ban stated that the BJP relies on strong relationships and majority numbers, not money, while mocking MVA's habit of withdrawing candidates.

  • Hashtags: #BJPMaharashtra #NavnathBan #SanjayRaut #MLCElections #MaharashtraPolitics #Mahayuti #MVA #MarathiNews

'कार्यकर्ते आणि नेते टिकवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम लागते'; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन  'कार्यकर्ते आणि नेते टिकवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम लागते'; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन Reviewed by ANN news network on ६/०५/२०२६ ०४:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".