मुंबई: बृहन्मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (गुन्हे शाखा) विविध गुन्ह्यांत जप्त केलेला तब्बल ६६५ कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा बंदिस्त भट्टीत जाळून पूर्णपणे नष्ट केला आहे. यामध्ये १२७५ किलो वजनाचे कोकेन, मेफेड्रॉन, गांजा, चरस, हेरॉईन, इफेड्रीन पावडर, हायड्रो गांजा आणि ५,६०६ कोडीन मिश्रित बॉटल्सचा समावेश होता. अंमली पदार्थ मुक्त समाज बनविण्याच्या उद्देशाने २० जून २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील तळोजा एमआयडीसीत असलेल्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त 'री सस्टेनेबिलिटी लिमिटेड'च्या प्लॉट्सवर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही विल्हेवाट लावण्यात आली.
अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटक स्तरीय ड्रग डिस्पोजल कमिटीच्या थेट देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कमिटीचे अध्यक्ष तथा पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा, सदस्य तथा अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्ण कान्त उपाध्याय आणि सदस्य तथा पोलीस उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (कलीना) येथील तज्ज्ञ अधिकारीही घटनास्थळी प्रत्यक्ष हजर होते.
पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती आणि पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण साठा नष्ट करण्याची तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया अत्यंत सुरक्षित वातावरणात पार पाडण्यात आली. या यशस्वी मोहिमेत प्रभारी पोलीस निरीक्षक (भांडारगृह) सचिन पाटील, सहायक फौजदार शेडगे (बक्कल क्रमांक ३०९५९), सहायक फौजदार चाळके (बक्कल क्रमांक ३३३४९), हवालदार पडळकर (बक्कल क्रमांक ९६०९१७), महिला पोलीस शिपाई जेठे (बक्कल क्रमांक ११२४७५) आणि शिपाई जाधव (बक्कल क्रमांक १४१४१०) यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून ही प्रक्रिया पूर्ण केली.
Labels: Mumbai Police, Drug Disposal Mumbai, Anti Narcotics Cell, Deven Bharti CP, Drugs Destroyed Taloja, Mumbai Crime Branch.
Search Description: Mumbai Police Anti Narcotics Cell destroyed 1275 kg of seized drugs worth Rs 665 Crore including Cocaine and Mephedrone at a Taloja incinerator.
Hashtags: #DrugFreeMumbai #MumbaiPolice #AntiNarcotics #CrimeBranch #DrugsDestroyed #LawAndOrder #MumbaiNews
अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ६६५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले भट्टीत जाळून नष्ट
Reviewed by ANN news network
on
६/२२/२०२६ १०:०९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: