एका तक्रारदाराने ऑनलाईन पद्धतीने जीएसटी नंबर मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हा नंबर मिळवून देण्याच्या मोबदल्यात माझगाव येथील कार्यालयातील राज्यकर निरीक्षक संदीप खलाटे याने तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १७ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी, मुंबई येथे येऊन रीतसर तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, खलाटे याने लाच मागून ती स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले.
या पडताळणीनंतर १८ जून २०२६ रोजी माझगाव येथील वस्तू व सेवाकर कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा कारवाई आयोजित केली. तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना लोकसेवक संदीप खलाटे याला पथकाने रंगेहात पकडले. अपर पोलीस आयुक्त (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप दिवाण आणि अपर पोलीस उप आयुक्त अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे आणि पर्यवेक्षक अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त गंगाप्रसाद मुदिराज यांनी ही यशस्वी कारवाई केली. नागरिकांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) अजित सुळे यांनी केले आहे
.
Labels: ACB Mumbai, Bribery Arrest Mumbai, GST Inspector Caught, Mazgaon GST Office, Anti Corruption Bureau Maharashtra, Corruption Case.
Search Description: Mumbai Anti Corruption Bureau (ACB) caught State Tax Inspector Sandeep Khalate red-handed while accepting a bribe of Rs 10,000 for issuing a GST number.
Hashtags: #ACBMumbai #AntiCorruption #GSTMumbai #BriberyCase #MaharashtraPolice #CorruptionFreeIndia #MumbaiNews
वस्तू व सेवा कर कार्यालयात एसीबीचा छापा; लाचखोर लोकसेवकाला रंगेहात पकडले
Reviewed by ANN news network
on
६/२२/२०२६ १०:३०:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/२२/२०२६ १०:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: