मुंढवा-खराडी रस्त्यावर अँटी-नार्कोटिक्स सेलचा मोठा दणका; २१ लाखांच्या 'मेफेड्रोन' (MD) ड्रग्ससह राजस्थानचा तस्कर जेरबंद!

पुणे/खराडी, दि. ८ जून २०२६: पुणे शहरातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या कडक आदेशांनुसार कारवाई करताना, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मुंढवा-खराडी रस्त्यावर मोठी कारवाई केली आहे. खराडी येथील एका बस स्टॉपजवळ संशयास्पद रित्या मेफेड्रोन (एम.डी.) या अत्यंत घातक ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आंतरराज्यीय तस्कराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून २१,०८,४०० रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यात २०,९८,४०० रुपये किमतीचे १०४ ग्रॅम ९२ मिलीग्रॅम मेफेड्रोन (MD) अंमली पदार्थ आणि एका मोबाईलचा समावेश आहे.

 इमरान युसुफ शेख (वय ३८, रा. स.नं. १४/७९, थिटेनगर, दत्त मंदिराजवळ, विरभद्र बिल्डिंग शेजारील इमारत, तिसरा मजला, थिटेवस्ती, खराडी, पुणे; मूळ गाव: गायरी मोहल्ला, बसद, जुन्या मशिदीजवळ, प्रतापगढ, राजस्थान)  असे आरोपीचे नाव असून  झडतीमध्ये त्याच्याकडे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगलेले १०४ ग्रॅम ९२ मिलीग्रॅम मेफेड्रॉन सापडले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८ (क), २१ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा माल त्याने राजस्थानमधून आणला की पुण्यात अन्य कोणाकडून घेतला, याचा तपास सुरु आहे.

 ५ जून २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांचे पथक खराडी हद्दीत गस्त घालत होते. गस्ती दरम्यान पोलीस अंमलदार निशिकांत सावंत यांना एच.पी. पेट्रोल पंपापासून काही अंतरावर असलेल्या बस स्टॉप शेजारी, मुंढवा-खराडी रोड येथे इमरान शेख संशयास्पद स्थितीत उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय बळावल्याने दोन पंचांसमक्ष त्याची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्याच्याकडे मेफेड्रॉन सापडले. 

ही कामगिरी आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वाहीद पठाण व पथकाने केली.


  • Labels: Anti Narcotics Cell Pune, Mephedrone MD Drug Seized, Kharadi Police Station NDPS, Imran Yusuf Sheikh Arrested, Pune Drug Bust.

  • Search Description: Pune Police Anti-Narcotics Cell-1 seized 104 grams of Mephedrone (MD) drugs worth Rs 21 Lakhs near Kharadi-Mundhwa Road and arrested Rajasthan-based smuggler Imran Sheikh.

  • Hashtags: #AntiNarcoticsCell #MephedroneSeized #MDDrugs #PuneDrugBust #KharadiCrime #PratapgarhRajasthan #AmiteshKumar

मुंढवा-खराडी रस्त्यावर अँटी-नार्कोटिक्स सेलचा मोठा दणका; २१ लाखांच्या 'मेफेड्रोन' (MD) ड्रग्ससह राजस्थानचा तस्कर जेरबंद! मुंढवा-खराडी रस्त्यावर अँटी-नार्कोटिक्स सेलचा मोठा दणका; २१ लाखांच्या 'मेफेड्रोन' (MD) ड्रग्ससह राजस्थानचा तस्कर जेरबंद! Reviewed by ANN news network on ६/०८/२०२६ ०१:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".