पत्रकार परिषदेत अभय टिळक यांच्यासह राजू महाराज ढोरे आणि स्वाती मुळे उपस्थित होत्या. उत्तराखंड सरकारने ज्याप्रमाणे 'देवभूमी' संकल्पना राबवून विशिष्ट परिसराचे पावित्र्य जतन केले आहे, तसाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याची गरज टिळक यांनी व्यक्त केली. या परिसराची सामाजिक सुरक्षितता आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी हा विषय सभागृहात मांडून तो मंजूर करून घ्यावा, असे राजू महाराज ढोरे यांनी सांगितले. पंढरपूर वारीपूर्वी राज्य सरकार, राज्यपाल आणि केंद्र सरकारला यासंदर्भात निवेदन देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या १५ वर्षांत या परिसरात झपाट्याने शहरीकरण झाले असून, वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. इंद्रायणी नदीपात्रात थेट सांडपाणी सोडले जात असल्याने प्रदूषणाची समस्या वाढली असून, शैक्षणिक संस्थांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीचा ताणही वाढला आहे. ही पंचक्रोशी 'संतभूमी' म्हणून जाहीर झाल्यास विकासकामांना अधिक शिस्त लागेल आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे सोपे होईल, असे स्वाती मुळे यांनी यावेळी नमूद केले. या मागणीसाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध स्तरावरील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व्यापक मोहीम राबवण्यात येणार आहे.
Labels:
Dehu-Alandi Palkhi Marg,Santbhumi Demand,Warkari Sampraday,Pimpri Chinchwad News,Cultural Heritage PreservationSearch Description: Abhay Tilak and Raju Maharaj Dhore demanded the Dehu-Alandi Palkhi route be declared as 'Santbhumi' to preserve its sanctity and ecological balance.
Hashtags: #Santbhumi #DehuAlandi #WarkariSampraday #MaharashtraAssembly #PimpriChinchwad #AstraNewsNetwork
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: