उत्तर अमेरिकेतील मराठी आणि संपूर्ण भारतीय समुदायासाठी 'नाफा फिल्म फेस्टिव्हल' हा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि भव्य सांस्कृतिक सोहळा बनला आहे. दरवर्षी भारतातील अग्रगण्य चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंत या व्यासपीठावर एकत्र येतात. गतवर्षी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती. यंदाच्या तिसऱ्या वर्षात या सोहळ्याची व्याप्ती अधिक वाढली असून, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रख्यात गीतकार गुरू ठाकूर, अभिनेत्री श्रुती मराठे आणि गिरिजा ओक यांच्यासह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज तारे-तारका सॅन होजे येथील रेड कार्पेटवर उतरणार आहेत.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'NAFA Stream' या विशेष ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. "परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी आणि भारतातील प्रादेशिक चित्रपट निर्मात्यांसाठी हे जागतिक डिजिटल व्यासपीठ अत्यंत स्वागतार्ह आहे. यामुळे महाराष्ट्रातील चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि थेट जागतिक प्रेक्षकवर्ग मिळण्यास मोठी मदत होईल," असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अभिजीत घोलप म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे वैभव आणि सन्मान अधिक उंचावेल. उत्तर अमेरिकेतील हजारो मराठी आणि भारतीय रसिक मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक स्वागतासाठी कमालीचे उत्सुक असून, हा सोहळा जागतिक मराठी ऐक्याचे नवे पर्व ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Labels:
Devendra Fadnavis USA Visit,NAFA Film Festival 2026,Abhijit Gholap Producer,San Jose Marathi Festival,Nagraj Manjule Mahesh Manjrekar,NAFA Stream OTTSearch Description: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis confirms his attendance at the 3rd North American Film Association (NAFA) Film Festival 2026 in San Jose, California.
Hashtags: #NAFA2026 #DevendraFadnavis #AbhijitGholap #MarathiCinema #SanJoseEvents #MarathiOTT #NagrajManjule #BreakingNewsMarathi
Reviewed by ANN news network
on
६/१६/२०२६ ०३:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: