पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी ठाकरे गटाच्या जन्मावरून आणि विचारसरणीवरून संजय राऊत यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले की, अवघ्या चार वर्षांपूर्वी काँग्रेसच्या कुशीतून या गटाचा जन्म झाला असल्याने, या गटाची खरी 'सरोगेट मदर' काँग्रेसच आहे. धनुष्यबाण आणि मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असून तिचा ६० वा वर्धापन दिन अधिकृतपणे साजरा झाला आहे. मूळ शिवसेनेचा डीएनए हा हिंदुत्व आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे; मात्र ठाकरे गटाचा डीएनए आता औरंगजेब आणि अफजलखान फॅन क्लबचा म्हणजेच पाकिस्तानधार्जिणा झाला आहे, कारण ते सातत्याने पाकिस्तानचा उदोउदो करत आहेत, असा गंभीर आरोप बन यांनी केला.
यासोबतच, काल मुंबईत झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यात ठाकरे गटांतर्गत तीव्र मतभेद चव्हाट्यावर आल्याचा दावा बन यांनी केला. कालच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना भाषण करण्याची आणि शिव्या देण्याची पूर्ण तयारी असतानाही स्पष्ट शब्दात नकार देऊन त्यांना बोलू दिले नाही. हा प्रकार म्हणजे आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा थेट अंतर्गत सामना असून, येत्या काळात संजय राऊत यांच्यामुळेच पक्षाची होत असलेली वाताहत पाहून आदित्य ठाकरे त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवतील आणि हा राजकीय 'भोंगा' कायमचा म्यूट करतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले. संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेताना, राऊत हे स्वतःच पक्षात नटरंग आणि नाच्याची भूमिका व तमाशा करत असून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना याच रूपात ओळखले असल्याची टीका करत बन यांनी पत्रकार परिषदेचा समारोप केला.
Labels:
Navnath Ban BJP Press Conference,Uddhav Thackeray U Turn Allegation,Sanjay Raut Bhonga Muted,Eknath Shinde Real Shiv Sena,Maharashtra Political War 2026Search Description: BJP Chief Spokesperson Navnath Ban attacks Uddhav Thackeray over resignation offer, claiming he will take a U-turn, while celling Sanjay Raut's speech muted by Aditya Thackeray.
Hashtags: #NavnathBan #UddhavThackeray #SanjayRaut #BJPResponse #ShivSenaFoundationDay #AstraNewsNetwork
Reviewed by ANN news network
on
६/२०/२०२६ ०३:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: