३ मजले सीलबंद! पार्किंगमधील अतिक्रमणही हटवले; पीएमआयसी ॲक्शन मोडवर!
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पेठ शिवाजीनगर, भांबुर्डा येथील सि.स.नं. १२५६/२अ, फा.प्लॉट नं. ६२१/२अ वर असलेल्या 'बोरावके टॉवर्स'मध्ये विना भोगवटा पत्र व्यावसायिक वापर सुरू असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी बांधकाम विकास विभागामार्फत संबंधितांना आधी रीतसर सूचनापत्रही देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही वापर सुरूच राहिल्याने तसेच पुणे महानगरपालिकेचा मिळकत कर भरला नसल्याने, शहर अभियंता यांच्या मान्यतेने 'महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम' कलम २६८ (१) (ओ) अन्वये सदर मिळकतीचा वापर बंद करण्यासाठी आज, २० मे रोजी ही इमारत सील करण्यात आली. याशिवाय, संबंधित इमारतीच्या पार्किंग जागेत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम (अतिक्रमण) देखील महापालिकेच्या पथकाने यावेळी निष्कासित (तोडून टाकले) केले.
सदर धडक कारवाई पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर व अधीक्षक अभियंता श्री. प्रविण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या वेळी बांधकाम विकास विभाग क्र. ६ चे कार्यकारी अभियंता श्री. सुरेंद्र कर्पे, उपअभियंता श्री. रणजित मुटकुळे, शाखा अभियंता श्री. महेशकुमार शिंदे आणि आरेखक श्री. विकास निंबाळकर यांच्यासह पालिकेचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. नियमबाह्य बांधकाम आणि कर थकवणाऱ्या इतरही व्यावसायिक मिळकतींवर आगामी काळात अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका सूत्रांनी दिला आहे.
Labels: Pune News, PMC Action, Property Sealed, JM Road Deccan, Borawake Towers, Encroachment Drive, Pune Municipal Corporation, Property Tax Default
Search Description: Pune Municipal Corporation (PMC) seals first, second, and third floors of Borawake Towers on JM Road, Deccan, due to unauthorized occupancy and non-payment of property tax.
Hashtags: #PuneNews #PMCAction #JMRoad #DeccanGymkhana #EncroachmentDrive #PropertyTax #PuneCorporation #UnauthorizedConstruction
Reviewed by ANN news network
on
५/२०/२०२६ १०:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: