सत्याग्रहाशिवाय आता कोणताही मार्ग नाही! 'महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद' व्याख्यानाचा पिंपरीत समारोप
रविवार, २४ मे २०२६ रोजी संपन्न झालेल्या या वैचारिक सोहळ्याला सेवाग्राम आश्रमाचे सचिव व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे, आयोजक दाहर मुजावर, अक्षय शहरकर, केनिथ रेमी यांच्यासह विष्णू नेवाळे, अशोक मोरे, अमरसिंह नाणेकर आणि पिंपरी-पुणे परिसरातील अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत अक्षय शहरकर व केनिथ रेमी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाहर मुजावर यांनी केले.
"राष्ट्र म्हणजे केवळ मी, माझी जात किंवा माझा धर्म असा उलटा आणि संकुचित प्रवास सध्या देशात सुरू आहे. पेट्रोल-डिझेल २०० रुपये प्रतिलिटर झाले तरी चालेल, पण अमूक एक नेता किंवा पक्षच पाहिजे, अशी भूमिका घेणे ही निव्वळ मानसिक दिवाळीखोरी आहे."
— हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते
आपल्या भाषणात सपकाळ यांनी तरुण विचारांच्या संघटनांच्या कार्यपद्धतीवरही कडक शब्दांत बोट ठेवले. ते म्हणाले की, समाजात 'कॉक्रोच पार्टी' (विकृत व संकुचित विचारसरणी) निर्माण होणे हे आपल्यासारख्या पुरोगामी आणि तरुण संघटनांचे मोठे अपयश (Failure) आहे. अशा पक्षांमध्ये केवळ आक्रोश असतो. सध्या जनतेचा मेंदू पुन्हा गुलाम करण्याची प्रक्रिया पद्धतशीरपणे सुरू आहे आणि दुर्दैवाने बहुतेकांना या 'कम्फर्ट झोन'मध्ये राहणे आवडत आहे. देशातील नागरिक आणि कार्यकर्ते आता केवळ निरीक्षक, समीक्षक आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत जात असून, प्रत्यक्ष कृती करण्यापासून लांब पळत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
व्याख्यानाचा समारोप करताना त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले की, प्रत्येकामधील 'मी'पणा बाजूला ठेवून एकत्र आल्याशिवाय कोणतीही क्रांती शक्य नाही. फुले, शाहू, आंबेडकर, नेहरू आणि गांधी यांना अभिप्रेत असलेला सर्वसमावेशक राष्ट्रवाद जिवंत ठेवण्यासाठी आता केवळ भाषणे नको, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून सत्याग्रह करण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी तरुण पिढीला विचारमंथन करण्याचे आवाहन केले.
Labels:
Political News,Pimpri Pune,Harshvardhan Sapkal,Congress Maharashtra,Mahatma Gandhi,Nationalism Debate,Youth OrganizationsSearch Description: Maharashtra Congress leader Harshvardhan Sapkal criticizes narrow nationalism and youth organization failures at 'Mahatma Gandhi and Nationalism' lecture in Pimpri, calling for active resistance.
Hashtags: #HarshvardhanSapkal #PimpriNews #MahatmaGandhi #Nationalism #CongressMaharashtra #YouthFailure #Satyagraha #PoliticalDebate
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: