मुंबई:मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणि वारंवार जामिनावर सुटून पुन्हा तोच काळा व्यवसाय करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मुंबई पोलिसांनी आता कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने दिलेल्या प्रस्तावावरून, धारावीतील कुख्यात ड्रग्ज तस्कर इक्बाल मोहम्मद अली शेख (वय ३६ वर्षे) याला 'पिट-एनडीपीएस' कायद्यान्वये एक वर्षाकरिता येरवडा मध्यवर्ती कारागृहात (पुणे) स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
८ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेला आरोपी इक्बाल मोहम्मद अली शेख (रा. भगतींग नगर झोपडपट्टी, कुंभारवाडा, सुभाष नगर, टाटा पॉवर जवळ, ९० फूट रोड, धारावी, मुंबई) हा पोलिसांच्या अभिलेखावरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी (NDPS) कायद्यांतर्गत तब्बल ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये वरळी युनिट (गु.क्र. ९५/२०२५), साकीनाका पोलीस ठाणे आणि धारावी पोलीस ठाण्यातील अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) देखील दाखल करण्यात आलेले आहे.
जामिनावर सुटताच पुन्हा सुरू करायचा ड्रग्जचा धंदा
इक्बाल शेख हा पोलीस कारवाईत अटक झाल्यानंतर न्यायालयाकडून जामीन मिळवून बाहेर यायचा. मात्र, जामिनावर सुटताच तो पुन्हा धारावी आणि मुंबईच्या इतर भागांत अंमली पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी व विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा. त्याच्या या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत होती आणि परिसरातील सार्वजनिक स्वास्थ्याला मोठा धोका निर्माण झाला होता. त्याच्यावर नेहमीच्या प्रतिबंधक कारवायांचा काहीही परिणाम होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
'PIT-NDPS' अंतर्गत अखेर आवळल्या आवळल्या बेड्या
आरोपीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी 'प्रिव्हेंशन ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, १९८८' (PIT-NDPS Act) अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी पाठवला होता.
मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी यांनी या प्रस्तावाची गंभीर दखल घेत, आरोपी इक्बाल शेख याला १ वर्षाच्या कालावधीसाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश (क्र. १०/पिट-एनडीपीएस/२०२६, दिनांक २२/०५/२०२६) जारी केले. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने २४ मे २०२६ रोजी त्याला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात रवाना केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात यशस्वी कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, पोलीस सह-आुक्त (गुन्हे) श्री. लक्ष्मी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशीकुमार मीना, आणि पोलीस उप-आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) श्री. दत्ता नलावडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हा प्रस्ताव तयार करून कारवाई यशस्वी करण्यासाठी वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. संदीप काळे, पोलीस निरीक्षक श्री. अमरेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रशांत पिसाळ आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या संपूर्ण अंमलदार पथकाने विशेष मेहनत घेतली.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास (Crime Record - NDPS Act)
| अ.क्र. | पोलीस ठाणे / युनिट | गुन्हा नोंद क्रमांक (CR No.) | कायदा आणि कलमे |
| १ | वरळी युनिट (ANC) | गु.क्र. ९५/२०२५ | कलम ८(क) सह २२(क), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट |
| २ | धारावी पोलीस ठाणे | गु.क्र. ११५/२०२० | कलम ८(क) सह २२ एन.डी.पी.एस. ॲक्ट |
| ३ | धारावी पोलीस ठाणे | गु.क्र. १५१/२०२१ | कलम ८(क) सह २२(ब), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट |
| ४ | धारावी पोलीस ठाणे | गु.र.क्र. २७७/२० २०२२ | कलम ८(क) सह २१(ब), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट |
| ५ | धारावी पोलीस ठाणे | गु.क्र. ७८३/२०२२ | कलम ८(क) सह २१(ब) एन.डी.पी.एस. ॲक्ट |
| ६ | धारावी पोलीस ठाणे | गु.क्र. १०९५/२०२२ | कलम ८(क) सह २२ एन.डी.पी.एस. कायदा |
| ७ | साकीनाका पोलीस ठाणे | गु.र.क्र. ७८७/२०२३ | कलम ८(क) सह २२(क), २९ एन.डी.पी.एस. कायदा |
| ८ | साकीनाका पोलीस ठाणे | गु.क्र. ८७६/२०२५ | कलम ८(क) सह २२, २९ एन.डी.पी.एस. कायदा |
सराईत ड्रग्ज तस्कर इक्बाल शेख १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध
Reviewed by ANN news network
on
५/२५/२०२६ ०४:४०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/२५/२०२६ ०४:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: