विशेष प्रतिनिधी, मुंबई : "नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांचे नव्हे तर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या प्रकरणातील मूळ अड्ड्यांवर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने 'सर्जिकल स्ट्राईक' करून कडक कारवाई सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत कोणीही आपली जबाबदारी झटकलेली नाही. मात्र, संजय राऊत सध्या निराशेच्या गर्तेत गेले असून वैफल्यग्रस्त झाले आहेत. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल तर या प्रकरणात काँग्रेसला आणि राहुल गांधींना जाब विचारा," असे जाहीर आव्हान भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी दिले.
काँग्रेसचे लागेबांधे असलेला मोटेगावकर तुरुंगात; राऊतांचा पोटशूळ का?
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठणकावून सांगितले की, "नीट परीक्षा सुरळीत व्हावी म्हणून केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली जात असताना संजय राऊत यांच्या पोटात का दुखत आहे? कारण, महाराष्ट्रात या प्रकरणाचे धागेदोरे काँग्रेसशी जोडलेले आहेत. काँग्रेसशी लागेबांधे असलेला मुख्य संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर आज सीबीआयच्या ताब्यात असून तुरुंगात आहे. यावर संजय राऊत चकार शब्दही काढायला तयार नाहीत. त्यामुळे आधी राहुल गांधींना जाब विचारा आणि मगच भाजपावर टीका करा. भाजपाचा या पेपरफुटीशी काडीचाही संबंध नाही".
उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठीच रणनीती?
संजय राऊत यांच्या पक्षांच्या भवितव्याबाबतच्या भविष्यवाणीचा खरपूस समाचार घेताना बन म्हणाले, "दुसऱ्यांचे पक्ष संपण्याची भविष्यवाणी राऊत यांनी आता बंद करावी; कारण महाराष्ट्रातील जनतेने त्यांचाच पक्ष संपवला आहे. आगामी काळात उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठीच संजय राऊत प्रयत्न करत आहेत, हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. त्यांनी राहुल गांधींकडून याची सुपारी घेतली आहे का, असा सवाल निर्माण होतो. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे हे शिवसेना चालवण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहेत. त्यामुळे राऊत यांनी स्वतःचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला कसा बांधता येईल, या आपल्या मूळ रणनीतीकडेच लक्ष द्यावे".
अस्तित्व संपल्याची राऊतांची कबुली; बन यांनी ओढले आसूड
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना नवनाथ बन यांनी उपरोधिकपणे संजय राऊत यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "आपले अस्तित्व संपले आहे हे राऊतांनी मान्य केल्याबद्दल धन्यवाद. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने तुम्हाला भोपळा दिला आहे. संजय राऊत यांनी आता हर्षवर्धन सपकाळ यांनाही भोपळा स्वीकारण्याची तयारी ठेवण्यास सांगावे. काँग्रेसची आणि तुमची खुमखुमी आता पूर्णपणे जिरली आहे. निवडणूक न लढवता पुढच्या तयारीला लागण्याची भाषा राऊत आता करत आहेत. मात्र, ज्या पद्धतीने ते इतर पक्ष संपल्याची भविष्यवाणी करत आहेत, त्यामुळे येत्या काळात त्यांची अवस्था अत्यंत वाईट होईल आणि संपूर्ण उबाठा गट लयाला जाऊन काँग्रेसमध्ये विलीन होईल," अशा तीव्र शब्दांत बन यांनी राऊतांवर आसूड ओढले.
Metadata (In English)
Labels: Political Controversy, BJP Maharashtra, Navnath Ban, Sanjay Raut, NEET Paper Leak, Congress, Maharashtra Politics.
Search Description: BJP State Chief Spokesperson Navnath Ban slammed Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut over the NEET paper leak case, challenging him to question Rahul Gandhi and Congress regarding the arrest of Shivraj Motegaonkar.
Hashtags: #MaharashtraPolitics #NEETPaperLeak #BJP #SanjayRaut #NavnathBan #Congress #PoliticalWarOfWords
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२६ ०२:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: