'लव्ह जिहाद विरोधी कायदा' करण्यासाठी पुणे जिल्ह्यात अधिवक्त्यांची स्वाक्षरी मोहीम

 


राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या मोहिमेत १५० हून अधिक वकिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांना निवेदन

पुणे: महाराष्ट्रात उत्तरप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांप्रमाणेच कठोर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला शिवाजीनगर, मोरवाडी (पिंपरी) आणि वडगाव (मावळ) येथील न्यायालयांमध्ये वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या मोहिमेत १५० हून अधिक अधिवक्त्यांनी सहभाग नोंदवला, यात महिला अधिवक्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एस. के. जैन यांनी तात्काळ स्वाक्षरी मोहीममध्ये सहभाग घेतला आणि त्यांच्या कार्यालयातील इतर वकिलांनाही सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. वडगाव मावळ बार असोसिएशनचे सचिव ॲड. अमोल दाभाडे यांनीही स्वाक्षरी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला.

खासदार मेधा कुलकर्णी यांच्याशी चर्चा

या कायद्याच्या मागणीसाठी राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या काही अधिवक्त्यांनी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन सादर करण्यात आले. कुलकर्णी यांनी या मागणीला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आवश्यकतेनुसार सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच समितीच्या कार्याबद्दल कौतुक केले.

मोहिमेदरम्यान काही अधिवक्त्यांनी 'लव्ह जिहाद' या विषयावर जनजागृतीसाठी व्याख्यान आयोजित करण्याची मागणीही केली.


Labels: Love Jihad, Anti-Conversion Law, Pune Court, Signature Campaign, Advocates Committee

  Search Description: Rashtrabhakt Adhivakta Samiti launched a signature campaign across various courts in Pune district, gathering support from over 150 advocates, to demand a strict Anti-'Love Jihad' law in Maharashtra, similar to those in other states. 

Hashtags: #LoveJihadLaw #MaharashtraPolitics #PuneAdvocates #SignatureCampaign #AntiConversionLaw #PuneNews

'लव्ह जिहाद विरोधी कायदा' करण्यासाठी पुणे जिल्ह्यात अधिवक्त्यांची स्वाक्षरी मोहीम 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' करण्यासाठी पुणे जिल्ह्यात अधिवक्त्यांची स्वाक्षरी मोहीम Reviewed by ANN news network on १०/०५/२०२५ ०४:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".