महिलांनी अत्याचाराविरुद्ध न घाबरता तक्रार दाखल करावी - राज्य महिला आयोगाचे आवाहन
पुणे, (प्रतिनिधी): महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासह त्यांच्यामध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी संबंधित संस्था प्रशासनाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले. त्यांनी महिलांना अत्याचाराविरुद्ध न घाबरता पुढे येऊन अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि 'एव्हीके पॉश ॲडव्हायझरी सर्व्हिसेस' यांच्या वतीने पुण्यात आयोजित 'पॉश' कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
रूपाली चाकणकर म्हणाल्या की, कामाच्या ठिकाणी असलेल्या तक्रार निवारण समितीने सामाजिक जबाबदारी बाळगून महिलांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कायद्यानुसार प्रक्रिया राबवून न्याय मिळवून द्यावा. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध, मनाई आणि निवारण करण्यासाठी असलेल्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
Rupali Chakankar
Women's Safety
POSH Act
Workplace Harassment
Pune Workshop
#RupaliChakankar #WomensSafety #POSHAct #WorkplaceHarassment #Maharashtra #Pune #WomenEmpowerment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: