गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीची सुविधा
शिवसैनिकांकडून भाविकांसाठी पाणी आणि नाश्त्याची सोयमुंबई, (प्रतिनिधी): गणेशोत्सवानिमित्त कोकणातील गणेशभक्तांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने यंदाही मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने ही सेवा दिली जात असल्यामुळे गणेशभक्तांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष आभार मानले.
या सेवेचा लाभ घेणाऱ्या गणेशभक्तांनी उपमुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. तसेच, बसमधील प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि चहा-नाश्त्याची व्यवस्था शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी केली होती.
या उपक्रमासाठी प्रभाग क्रमांक ७ मधील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, पुरुष व महिला शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांनी चांगले सहकार्य केले, अशी माहिती शिवसेना वॉर्ड क्र ७० चे शाखाप्रमुख निलेश परब यांनी दिली.
Eknath Shinde
Ganeshotsav
Free Bus Service
Mumbai
Shiv Sena
#EknathShinde #Ganeshotsav #FreeBusService #Mumbai #ShivSena

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: