पिंपरी/पुणे (प्रतिनिधी): आजच्या काळात विद्यार्थी मोबाईलचा जास्त वापर करत असून, त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता आपल्या शारीरिक क्षमतेवरही लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते दत्तात्रय पाष्टे यांनी केले.
ते कोकण खेड तालुका अठरागाव रहिवासी विकास संस्थेच्या स्नेहमेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी, मोबाईल हे आज जीवनावश्यक बनले असले तरी मुले त्याच्या जास्त आहारी गेल्याचे दिसून येते. पालकांनीही मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन केले. मुलांनी पुस्तकांचे वाचन करावे आणि मैदानी खेळ खेळावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
या कार्यक्रमात काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, माजी नगरसेविका निर्मलाताई कदम, विजया सुतार, संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी कोकणातील मुले आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, याचा अभिमान व्यक्त केला. तसेच संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी २००० साली संस्थेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.
या स्नेहमेळाव्यात दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, महिला आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
Pune, Pimpri, Education, Students, Health, Dattatraya Pashte, Social Event, Youth
#Pune #Pimpri #Students #Health #Education #MobileUsage #DattatrayaPashte #SocialEvent #Youth

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: