सह आयुक्तांचे मार्गदर्शन
यावेळी बोलताना सह आयुक्त मनोज लोणकर म्हणाले, "सेवानिवृत्त होणारे सहकारी आपल्या पुढील आयुष्यात वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार आहेत. त्यांची कामाची पद्धत, सेवाभाव आणि त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील." त्यांनी सर्व सेवानिवृत्तांना आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला उपायुक्त सचिन पवार, संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे
यामध्ये आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, उप अभियंता विजयकुमार शिंदे, मुख्याध्यापिका अनिता रोडगे, लेखाधिकारी चारुशीला जोशी, ग्रंथालय प्रमुख कल्पना जाधव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांमध्ये सफाई सेवक चंद्रशेखर शेलार, सुरेश शिवरकर, सफाई कामगार पुष्पा बनसोडे, अर्चना रोकडे आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC, Retirement Ceremony, Manoj Lonkar, Government Employees, Retirement Function, Pimpri News, Employee Welfare.
#PCMC #PimpriChinchwad #Retirement #ManojLonkar #PCMCNews #GovernmentEmployees #RetirementCeremony #Pimpri

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: