चिपळूणमध्ये वासिष्ठी नदी इशारा पातळीवर; शहरात अनेक ठिकाणी पाणी

 


मुसळधार पावसामुळे कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

महसूल, पोलीस आणि एनडीआरएफची पथके सज्ज; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चिपळूण-कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद

चिपळूण, (प्रतिनिधी): चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५.८२ मीटरवर पोहोचली असून, ती सध्या इशारा पातळीवर आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका, महसूल, पोलीस आणि एनडीआरएफची ११ पथके आणि ५ बोटी मदतकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांत कोळकेवाडी धरण परिसरात २२० मिमी आणि नवजा येथे ३१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोळकेवाडी धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने सकाळी १:१० वाजता एक मशीन सुरू करून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

शहरातील बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका, वडनाका, आईस फॅक्टरी आणि पेठमाफ इंडियन जीम या भागांमध्ये एक ते दीड फूट पाणी साचले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सखल भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. खेर्डी आणि हेळवाक येथे रस्त्यावर पाणी आल्याने चिपळूण-कराड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

नागरिकांना पुढील ८ तास सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



  • Chiplun

  • Vashishthi River

  • Flood Alert

  • Kolkewadi Dam

  • Maharashtra

#Chiplun #MaharashtraFloods #VashishthiRiver #Rainfall #FloodAlert

चिपळूणमध्ये वासिष्ठी नदी इशारा पातळीवर; शहरात अनेक ठिकाणी पाणी चिपळूणमध्ये वासिष्ठी नदी इशारा पातळीवर; शहरात अनेक ठिकाणी पाणी Reviewed by ANN news network on ८/१९/२०२५ ०२:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".