मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
राज्य 'डेटा सेंटर' आणि 'सौर ऊर्जा कॅपिटल' म्हणून पुढे येत आहे - मुख्यमंत्री
हायपरलूप प्रकल्पालाही मिळणार गती
मुंबई, (प्रतिनिधी): महाराष्ट्र आता "डेटा सेंटर कॅपिटल" आणि "सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल" म्हणून पुढे येत आहे. राज्यात विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या गुंतवणुकीसाठी १० सामंजस्य करारांवर (८ सामंजस्य करार आणि २ रणनीतिक करार) स्वाक्षरी करण्यात आली असून, त्यातून तब्बल ४२,८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे २८ हजारांपेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील समिती कक्षात या करारांचे आदानप्रदान झाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गुंतवणूकदारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे ही मोठी गुंतवणूक येत आहे. हायपरलूप प्रकल्पालाही आता आयआयटी मुंबई आणि आयआयटी मद्रास यांच्यामुळे गती मिळत असून, हा प्रकल्प लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात मोठे बदल घडवून आणेल.
या सामंजस्य करारांनुसार, ज्युपिटर इंटरनॅशनल लि. (सौर पॅनेल), रोचक सिस्टिम्स प्रा.लि., रोव्हिसन टेक हब प्रा.लि., वेबमिंट डिजिटल प्रा.लि. (सर्व डेटा सेंटरसाठी), वॉव आयर्न ॲण्ड स्टिल प्रा.लि. (पोलाद उद्योग), ॲटलास्ट कॉपको (औद्योगिक उपकरणे), एलएनके ग्रीन एनर्जी (हरित ऊर्जा) आणि प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लि. (डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स) या कंपन्यांसोबत करार झाले आहेत. याशिवाय, यूके आणि युरोपमधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि जेएनपीटी व वाढवण बंदरावर हायपरलूप व्यवस्था उभारण्यासाठीही दोन महत्त्वाचे करार झाले आहेत.
Maharashtra
Investment
Devendra Fadnavis
MoU
Job Creation
#Maharashtra #Investment #DevendraFadnavis #Jobs #Hyperloop #Mumbai

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: