मुंबई, (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीच्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनतारा संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. महादेवीला मठात परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे आणि यामध्ये वनतारा पक्षकार म्हणून सहभागी होण्यास तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वनताराच्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत असून, महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या वन विभागाने निवडलेल्या नांदणीजवळच्या जागेवर महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी वनताराच्या पथकाने दर्शवली आहे.
या चर्चेदरम्यान, वनतारा संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पुनर्वसन केंद्रासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि वनतारा संस्था यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे यावरून दिसून येते.
Mahadevi Elephant
Vantara
CM Devendra Fadnavis
Supreme Court
Elephant Rehabilitation
#MahadeviElephant #Vantara #DevendraFadnavis #SupremeCourt #Kolhapur #ElephantRehabilitation #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: