‘माकडछाप राऊत यांनी कमिशनच्या गप्पा मारू नयेत’; भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर
‘महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं’ - नवनाथ बन
मुंबई, (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांना महाजोकर करून घरी बसवले असून, देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले आहेत," असे बन यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत, त्यामुळेच तुम्हाला झळ बसत आहे." मुंबईतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना बन यांनी राऊतांना 'कमिशनच्या बाता मारू नयेत' असे सुनावले आणि 'मातोश्री-२ कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचे उत्तर आधी द्या' असा प्रतिप्रश्न केला.
२०२९ च्या निवडणुकीबाबत केलेल्या भविष्यवाणीवर उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, "२०२४ च्याच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले. २०२९ ची वाट पाहू नका, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतच मुंबईकर तुमच्या बडबडीला कंटाळून तुमच्या तोंडाला बुच लावतील."
Navnath Ban
Sanjay Raut
Maharashtra Politics
Uddhav Thackeray
BJP
#NavnathBan #SanjayRaut #MaharashtraPolitics #BJP #UddhavThackeray

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: