मेरठ पोलिसांची डोकेदुखी मुंबई गुन्हे शाखेने संपवली; २४ तासात गुन्ह्याची उकल
मुंबई (प्रतिनिधी): उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचा ऐवज घेऊन मुंबईत पळून आलेल्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यात सोने, चांदी आणि रोख रकमेचा समावेश आहे.
गुन्हे शाखेला
गुप्त माहिती मिळाली
होती की, मेरठ
येथील ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी
करून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचा ऐवज घेऊन दोन
आरोपी मुंबईच्या दिशेने
येणार आहेत आणि
ते बोरिवली येथे
थांबणार आहेत. या माहितीच्या आधारे
गुन्हे शाखेच्या पथकाने
बोरिवली येथे सापळा रचला
होता. या सापळ्यात सौरभ
तानाजी साठे (वय
२१) आणि मोहन
मारुती पवार (वय
२४) या दोन
आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने
ताब्यात घेतले.
आरोपींकडून ४७८.४५ ग्रॅम सोन्याचे दागिने
(अंदाजे किंमत ४८
लाख रुपये), ३.७९५ ग्रॅम पक्की
चांदी (अंदाजे ४.५० लाख रुपये),
८ किलो कच्ची
चांदी (अंदाजे ४.७६ लाख रुपये)
आणि २०,०००
रुपये रोख रक्कम
असा एकूण ५७
लाख ४६ हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आहे.
ही यशस्वी
कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त
देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे)
लखमी गौतम, पोलीस आयुक्त शैलेश
बलकवडे, उपआयुक्त विशाल ठाकूर,
आणि सहायक आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे
शाखेच्या पथकाने केली आहे.
Crime, Mumbai, Police, Robbery, Theft, Arrest, Jewelers
#MumbaiPolice #CrimeNews #RobberyArrest #JewelryTheft #MeerutRobbery #MumbaiCrimeBranch #StolenGoods #PoliceAction #UttarPradesh

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: