पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास - पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत
मुंबई, (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्ष कार्यालयात स्वागत केले.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यात बदल करून कामगारांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय वेतन कायदा सर्वांना लागू झाल्यामुळे आता वर्षातून दोन वेळा वेतनवाढ होणार आहे." तसेच, त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
मनसे कामगार संघटनेचे सुहास माटे यांनी सांगितले की, किमान वेतनासाठी केलेल्या करारानंतर पगारवाढ झाली. गेल्या काही महिन्यांत भाजपने कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यामुळेच आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशामध्ये निलेश कोळेकर, संजय गुणके, दत्ता भोसले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
MNS
BJP
Maharashtra Politics
Labor Union
Party Switch
#MaharashtraPolitics #MNS #BJP #RavindraChavan #DevendraFadnavis #LaborUnion

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: