बीपीसीएल कंपनी प्रशासनाची मुजोरी; स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीयांना रोजगार

 

उरणमध्ये स्थानिक माथाडी कामगारांचे तीव्र आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार

पैसे घेऊन परप्रांतीय कामगारांना काम दिल्याचा आरोप

१५ आणि १६ ऑगस्टच्या सुट्टीत स्थानिक कामगारांना न कळवता परप्रांतीय कामगारांना प्रवेश

उरण, (प्रतिनिधी): उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बीपीसीएल (भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड) कंपनी प्रशासनाने स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार दिल्याने स्थानिक कामगारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी कंपनीच्या गेटसमोरच अधिकाऱ्यांना घेराव घातला.

स्थानिक कामगारांनी आरोप केला आहे की, कंपनी प्रशासन मराठी माणसांचा अपमान करत आहे आणि पैसे घेऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना कामावर घेत आहे. १५ आणि १६ ऑगस्टच्या सुट्टीच्या दिवशी स्थानिक माथाडी कामगार काम करण्यास तयार असतानाही, त्यांना न कळवता परप्रांतीय कामगारांना कामावर घेतले गेले. हाच प्रकार १७ ऑगस्ट रोजीही घडल्याने कामगारांमध्ये रोष वाढला आहे.

टोळी क्रमांक २०४८ आणि ३०६८ च्या ९६ कामगारांनी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बीपीसीएलच्या गेटवर आंदोलन करून कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. यावेळी अधिकारी अरविंद चक्रवर्ती यांनी आरोप चुकीचे असल्याचे म्हटले असले तरी, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांची ओळखपत्रे दाखवण्यास नकार दिल्याने संशय अधिक वाढला आहे.

स्थानिक कामगारांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, "राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पात अनधिकृत आणि अप्रशिक्षित परप्रांतीय कामगारांमुळे काही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?" २००३ पासून नोंदणीकृत असलेल्या माथाडी कामगारांनाच कामात प्राधान्य मिळावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बीपीसीएल गेटसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडी कामगारांनी दिला आहे.



  • Mathadi Workers

  • BPCL

  • Uran Protest

  • Local Employment

  • Labor Dispute

 #Uran #MathadiWorkers #BPCL #LaborProtest #LocalEmployment #Maharashtra

बीपीसीएल कंपनी प्रशासनाची मुजोरी; स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीयांना रोजगार बीपीसीएल कंपनी प्रशासनाची मुजोरी; स्थानिक कामगारांना डावलून परप्रांतीयांना रोजगार Reviewed by ANN news network on ८/१८/२०२५ ०३:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".