पोलीस रेकॉर्डवरील आरोपीवर यापूर्वीही ४ गुन्हे दाखल
अवैध धंदे निर्मूलन मोहिमेअंतर्गत कारवाई दोन वर्षांसाठी तडीपार
पुणे : पुणे पोलिसांच्या कोंढवा पोलीस स्टेशनने अवैध धंदे निर्मूलन मोहिमेअंतर्गत एका सराईत गुन्हेगाराला तडीपार केले आहे.
विश्वजीत भीमराव गायकवाड (वय ४०) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात यापूर्वीच चार गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधक कारवाई करूनही त्याने पुन्हा गुन्हे केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या आरोपीला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
Pune Police
Crime
Tadipar
Illegal Liquor
Law Enforcement
#PunePolice #Tadipar #Crime #KondhwaPolice #IllegalLiquor #LawEnforcement

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: