सुरेश भोसले यांचे निधन

 

पिंपरी, पुणे (दि. ५ ऑगस्ट २०२५) हवाई दलाचे निवृत्त   फ्लाईंग ऑफिसर आणि मोशी प्राधिकरण, केंद्रीय विहार हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुरेश विनायक भोसले (वय ६१ वर्षे) यांचे सोमवारी (दि. ४) निधन झाले.

 भोसले हे १९८१ साली दिल्ली येथे हवाई दलात सेवेमध्ये रुजू झाले आणि २०२१ मध्ये पुण्यातून फ्लाईंग ऑफिसर या पदावरून निवृत्त झाले. सोमवारी, सायंकाळी केंद्रीय विहार मोशी येथे लोहगाव पुणे येथील हवाई दलाच्या तुकडीने त्यांना मानवंदना दिली. 

त्यांचे मूळगाव मु. पो. देवताळ मोतोला, तालुका औसा, जिल्हा लातूर येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या मागे वडील, पत्नी, एक विवाहित मुलगी, एक मुलगा, सून, जावई, नातू असा परिवार आहे.

Suresh Bhosale, Obituary, Flying Officer, Indian Air Force, Maval, Pimpri, Moshi Pradhikaran.

 #SureshBhosale #Obituary #IndianAirForce #Pimpri #Moshi #AirForce #Condolence


सुरेश भोसले यांचे निधन सुरेश भोसले यांचे निधन Reviewed by ANN news network on ८/०५/२०२५ ०६:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".