स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष योजना; फक्त १९४७ रुपयांत सौर प्रणालीचे मालक होण्याची संधी
पुढील तीन वर्षांत राज्यात ८०० मेगावॅट रूफटॉप सोलर यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य'मायसाईन' आणि 'सोलर डिझाईन स्पेसेस' या लाइफस्टाइल सोल्युशन्सची घोषणा
सुलभ कर्जसुविधा उपलब्ध; बँक ऑफ इंडियासह १५ वित्तीय संस्थांशी भागीदारी
पुणे, (प्रतिनिधी): अक्षय ऊर्जा क्षेत्रातील अग्रणी कंपनी 'टाटा पॉवर रिन्यूएबल्स'ने महाराष्ट्रात छतावरील सौरऊर्जा प्रणालीचा वापर वाढवण्यासाठी 'घरघर सोलर' ही महत्त्वाकांक्षी मोहीम पुण्यात सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश दर्जेदार, परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध सौरऊर्जा उपायांसह विश्वासार्ह सेवा प्रदान करणे आहे.
'टाटा पॉवर सोलारूफ'ने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे. या योजनेत ग्राहकांना फक्त १९४७ रुपये भरून छतावरील सौर प्रणालीचे मालक होता येईल. ही रक्कम भारताच्या स्वातंत्र्य वर्षाचे प्रतीक असून, महागड्या वीजबिलांपासून मुक्ततेचेही प्रतीक आहे. या प्रणालीच्या किंमतीसाठी जवळपास १०० टक्के कर्जसुविधा उपलब्ध आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:
प्रारंभिक भरणा: फक्त १९४७ रुपये.
परवडणारे मासिक हप्ते: २ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी २,३६९ रुपयांपासून सुरू.
सोयीस्कर कर्ज कालावधी: ६० महिन्यांपर्यंत.
अतिरिक्त लाभ: 'टाटा एआयजी'कडून एक वर्षाची मोफत सौर विमा सुविधा.
'पंतप्रधान सूर्य घर योजने'अंतर्गत निवासी ग्राहकांना केंद्र सरकारकडून पहिल्या २ किलोवॅट क्षमतेसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये आणि त्यानंतरच्या १ किलोवॅटसाठी प्रति किलोवॅट १८,००० रुपये इतकी अनुदानाची तरतूद आहे.
कंपनीने एसबीआय, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा यांसह १५ वित्तीय संस्थांशी भागीदारी केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना सुलभ कर्जसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. 'टाटा पॉवर सोलारूफ'ने महाराष्ट्रात आतापर्यंत ७७५ मेगावॅट क्षमतेच्या निवासी सौरऊर्जा यंत्रणा बसविल्या असून, पुढील तीन वर्षांत आणखी ८०० मेगावॅट क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे.
या मोहिमेअंतर्गत, कंपनीने 'मायसाईन' (अखंडित वीजपुरवठ्यासाठी कॉम्पॅक्ट बॅटरी बॅकअप प्रणाली) आणि 'सोलर डिझाईन स्पेसेस' (टिकाऊपणा आणि सौंदर्याचा संगम असलेली आकर्षक रूफटॉप यंत्रणा) या दोन नवीन लाइफस्टाइल सोल्युशन्सचीही घोषणा केली आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक ग्राहकांनी १८००२५७७७७७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tata Power
Ghar Ghar Solar
Rooftop Solar
Pune News
Renewable Energy
#TataPower #GharGharSolar #Pune #RenewableEnergy #SolarPower #Maharashtra #IndependenceDayOffer

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: