पुणे, (प्रतिनिधी): महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वे 'गांधी दर्शन शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबिर रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत गांधी भवन (कोथरूड, पुणे) येथे होणार आहे.
या शिबिरात गांधीवादी विचारांचा सखोल अभ्यास केलेल्या आणि सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये प्रा. राम पुनियानी 'गांधींची धार्मिक भूमिका' या विषयावर, मधुकर भावे 'गांधींनंतरचा महाराष्ट्र' या विषयावर, अविनाश पाटील 'भारतीय संदर्भात विवेकवाद' या विषयावर, तर डॉ. कुमार सप्तर्षी हेही मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे. इच्छुक व्यक्तींनी ॲड. स्वप्नील टोंडे (९९२३५२३२५४) किंवा तेजस भालेराव (९१७२४८७०१९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Gandhi Darshan Camp
Pune Event
Maharashtra Gandhi Memorial Trust
Yuvak Kranti Dal
Gandhian Philosophy
#GandhiDarshanCamp #PuneEvents #GandhianThought #GandhiBhavan #YouthRevolution #SocialMovement

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: