गणेशोत्सवाच्या तोंडावर धक्कादायक घटना; दहाहून अधिक मूर्तींची मोडतोड
धार्मिक भावना दुखावल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप
सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू
पुणे, (प्रतिनिधी): शहरात गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वीच हडपसरमधील भोसले गार्डन येथे गणेशमूर्तींच्या स्टॉलवर अज्ञातांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
📍 भोसले गार्डन, हडपसर, पुणे येथे माझ्या गणपती मूर्तीच्या स्टॉल वरती तोडफोड करण्यात आली आहे.
— हिंद सागर (@Hindsagar) August 20, 2025
👉🏻 पडदा फाडून 10-12 मोठ्या गणेशमूर्ती तोडण्यात आल्या आहेत.
👉🏻 लघवी केल्याचेही लक्षात आले आहे.
ही घटना खूपच निंदनीय आहे आणि हे कोणी जाणून-बुजून केले असावे का ?@Parag_hjs pic.twitter.com/9Owf6GXfnX
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी स्टॉलचा पडदा फाडून आत प्रवेश करत १० ते १२ मोठ्या गणेशमूर्तींची मोडतोड केली. इतकेच नव्हे तर मूर्तींच्या आजूबाजूला लघुशंका केल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे ही घटना केवळ तोडफोड नसून, जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्यासाठी घडवून आणली असावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.📍 भोसले गार्डन, हडपसर, पुणे येथे माझ्या गणपती मूर्तीच्या स्टॉल वरती तोडफोड करण्यात आली आहे.
— हिंद सागर (@Hindsagar) August 20, 2025
👉🏻 पडदा फाडून 10-12 मोठ्या गणेशमूर्ती तोडण्यात आल्या आहेत.
👉🏻 लघवी केल्याचेही लक्षात आले आहे.
ही घटना खूपच निंदनीय आहे आणि हे कोणी जाणून-बुजून केले असावे का ?@Parag_hjs pic.twitter.com/9Owf6GXfnX
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून, हे कृत्य नेमके कोणाकडून झाले याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Hadapsar
Vandalism
Ganesh Idols
Pune
Crime
#Pune #Hadapsar #Ganeshotsav #Vandalism #CrimeNews #GaneshIdol

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: