श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


मानाचा चौथा महागणपती: शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ५६१ जणांनी केले रक्तदान

पुणे, (प्रतिनिधी): पुण्याचा मानाचा चौथा महागणपती असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पुण्यातील नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध ढोल-ताशा पथकांतील वादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ५६१ तरुणाईने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

रविवारी, ३ ऑगस्ट २०२५ रोजी नु. म. वि. शाळेच्या मैदानावर हे शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडले. या प्रसंगी कसब्याचे आमदार श्री हेमंत रासने आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री धीरज घाटे यांनी शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या शिबिरात तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली.

या रक्तदान शिबिरात रुद्रांग वाद्यपथक, स्वरूपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, शिवमुद्रा, गजर प्रतिष्ठान, स्वराज्य ट्रस्ट, उगम प्रतिष्ठान, तालगर्जना, मैत्री वेलफेअर फाउंडेशन, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रह्म ट्रस्ट अशा अनेक ढोल-ताशा पथकांनी सहभागी होऊन सामाजिक उपक्रमाला पाठिंबा दिला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री विकास पवार, उपाध्यक्ष श्री विनायक कदम, कोषाध्यक्ष श्री नितीन पंडित, स्वागताध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


  • Blood Donation Camp

  • Tulshibaug Ganpati

  • Pune Event

  • Social Initiative

#TulshibaugGanpati #BloodDonation #Pune #SocialInitiative #GaneshFestival #PuneNews #CommunityService

श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by ANN news network on ८/०४/२०२५ ०९:१३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".