समाज विकास विभागातर्फे ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन
प्रक्रियेत सुलभता आणि गती आणून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश
उपायुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक प्रमाणपत्र वाटप
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने महिला बचत गटांच्या नोंदणीसाठी एक ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे आता शहरातील महिलांना घरबसल्याच बचत गटांच्या नोंदणीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रणालीद्वारे नोंदणी करणाऱ्या काही महिला बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यामध्ये रहाटणी येथील अंकुर महिला बचत गटातील सदस्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
यापूर्वी बचत गट नोंदणीची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होत होती, ज्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. आता ऑनलाइन प्रणालीमुळे महिलांना अधिक सोयीस्कर आणि जलद गतीने प्रमाणपत्र मिळवता येईल. महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन महिला बचत गट सहजपणे अर्ज करू शकतील.
यावेळी बोलताना उपायुक्त ममता शिंदे म्हणाल्या, “तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही महिलांसाठी ही प्रणाली विकसित केली आहे. यामुळे महिलांना प्रमाणपत्रे सुलभपणे आणि जलद गतीने उपलब्ध होणार आहेत. अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा.”
Pimpri-Chinchwad
Women Empowerment
Mahila Bachat Gat
Online Registration
Social Development
#PCMC #MahilaBachatGat #WomenEmpowerment #PimpriChinchwad #DigitalIndia #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: