१२ गहाळ मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत
'सीईआयआर' प्रणालीचा वापर करून कारवाई सायबर गुन्ह्यांतील चोरीचे फोनही सापडले
पोलीस उप-आयुक्तांच्या हस्ते हस्तांतरण
पुणे पोलिसांच्या समर्थ पोलीस स्टेशनने गहाळ झालेले आणि सायबर गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले १२ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ८,००,०००/- रुपये आहे. या १२ फोन्समध्ये ६ ॲपल कंपनीचे आयफोन आणि इतर ६ कंपन्यांचे मोबाईल फोन आहेत. केंद्र शासनाच्या 'सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर (CEIR)' या प्रणालीचा वापर करून ही कामगिरी करण्यात आली.
समर्थ पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून तांत्रिक तपास केला. या तपासातून हे मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि इतर राज्यांमध्ये वापरले जात असल्याचे आढळले. संबंधित वापरकर्ते आणि पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून पोलिसांनी हे मोबाईल परत मिळवले आहेत. हस्तगत केलेले हे मोबाईल फोन पोलीस उप-आयुक्त कृषिकेष रावले यांच्या हस्ते त्यांच्या मालकांना परत देण्यात येणार आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त कृषिकेष रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Pune Police
Mobile Recovery
Cyber Crime
CEIR
Theft
#PunePolice #MobileRecovery #CEIR #CyberCrime #SamarthPolice #Theft

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: