पाणी कपात टाळण्यासाठी पुणेकरांनी पाणी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करा; अन्यथा पाणीपुरवठा खंडित होईल - पुणे महापालिका
पुणे, ४ ऑगस्ट २०२५: धरणातून उचलले जाणारे पाणी आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारे पाणी यामध्ये असलेल्या तफावतीमुळे होणारी पाणीगळती थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरात १०० टक्के पाण्याचे मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. जे नागरिक मीटर बसवण्यासाठी विरोध करतील, त्यांचा नळजोड खंडित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्यास कारवाई
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी ही माहिती दिली आहे. सरकारच्या या महत्त्वाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मीटर बसवणे अत्यंत महत्त्वाचे असून, पुणेकरांनी यात सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
Pune Municipal Corporation, Water Supply, Water Meter, Water Scarcity, Pradeep Chandran, Pune News, Water Conservation.
#Pune #PMC #WaterSupply #WaterMeter #PuneNews #WaterConservation #MaharashtraNews #PradeepChandran

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: