ग्रामीण भागात कलेचा वारसा टिकून, पारंपरिक मूर्तींना प्राधान्य
शहरी भागात रेडिमेड मूर्ती, ग्रामीण भागात पाट देण्याची परंपरा कायम
रत्नागिरी, (प्रतिनिधी): कोकणातील अत्यंत महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव आता तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आला आहे. मूर्तिकाम अखेरच्या टप्प्यात असून, अनेक ठिकाणी मूर्तींचे रंगकाम सुरू झाले आहे. काही ठिकाणी रंगकामानंतरच्या रेखणीसारख्या नाजूक कलाकुसरीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे.
सध्या शहरी भागात दुकानांमधून गणेशमूर्ती विकत घेण्याची पद्धत वाढत आहे, तसेच हाती मूर्ती घडवण्याऐवजी साच्यातून मूर्ती तयार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी, ग्रामीण भागातील कुटुंबे आजही आपल्या कुटुंबाच्या पूर्वीपासूनच्या ठरलेल्या मूर्तीशाळेत गणपतीसाठी पाट देऊन दरवर्षी मूर्तीची नोंदणी करतात. यामुळे ग्रामीण भागात कलेचा वारसा टिकून राहण्यास मदत होत आहे.
जिल्ह्यात शाडूच्या मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीही तयार केल्या जातात. मूर्तिकार लवकरच या मूर्ती भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत.
Ganesh Chaturthi
Ratnagiri
Idol Making
Ganpati Murti
Traditional Art
#GaneshChaturthi #Ganpati #Ratnagiri #IdolMaking #MaharashtraFestival #Konkan

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: