मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी): वसई येथील बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात स्वागत केले.
वसई येथील पक्षप्रवेशात 'बविआ'चे माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसमधून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले. यामध्ये अनेक शीख बांधवांचाही समावेश होता. बविआ विभागप्रमुख राजू इस्साई आणि काँग्रेसचे करणदीप सिंग अरोरा यांच्यासारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही यावेळी भाजपचे कमळ हाती घेतले.
त्याचप्रमाणे, जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे जिल्हा परिषद माजी सदस्य संभाजी पाटील, चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती भरत पाटील आणि अनेक कार्यकर्ते, तसेच आदिवासी भिल्ल समाजातील कार्यकर्त्यांनीही राहुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आ. स्नेहा दुबे पंडित, आ. राजेश वानखेडे यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
BJP
Maharashtra Politics
Political Defection
Vasai
Jalgaon
Ravindra Chavan
#MaharashtraPolitics #BJP #PoliticalDefection #RavindraChavan #Vasai #Jalgaon

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: