गेल्या दोन दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये ७ जणांचा मृत्यू
शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला
मुंबई, (प्रतिनिधी): राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या दोन दिवसांत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला असून, तिथल्या नागरिकांनी पुढील काही दिवस सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः मुंबईसाठी पुढील १० ते १२ तास अत्यंत महत्त्वाचे असून, प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत.
Maharashtra
Heavy Rain
CM Devendra Fadnavis
Mumbai
Weather Alert
#MaharashtraRains #DevendraFadnavis #Mumbai #Rainfall #WeatherUpdate #FloodAlert
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: