जिल्ह्यात १९ ऑगस्ट रोजी 'ऑरेंज अलर्ट'; मुसळधार पावसाचा अंदाज
पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता; जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळीजिल्हाधिकाऱ्यांनी दिला शैक्षणिक संस्थांना सुट्टीचा आदेश
रत्नागिरी, (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी उद्या, १९ ऑगस्ट रोजी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सरकारी व खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांना उद्या सुट्टी राहील.
जिल्ह्यातील अनेक भागांत आधीच मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे, तर संगमेश्वर येथील शास्त्री आणि राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे.
Ratnagiri
School Holiday
Orange Alert
Heavy Rain
Flood Warning
#Ratnagiri #SchoolHoliday #Monsoon #OrangeAlert #Maharashtra #FloodWarning

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: